Home /News /national /

VIDEO : भरधाव कारमध्ये आगीनं धारण केलं रौद्र रूप, चालकाचा होरपळून मृत्यू

VIDEO : भरधाव कारमध्ये आगीनं धारण केलं रौद्र रूप, चालकाचा होरपळून मृत्यू

भर रस्त्यात कारमधून अचानक धूर आला आणि कारने पेट घेतला.

    अहमदाबाद, 16 मार्च : भर रस्त्यात कारमधून अचानक धूर आला आणि कारने पेट घेतला. ही दुर्घटना अहमदाबाद इथे घडली आहे. ही आग इतकी भीषण होती की काही क्षणातच सर्व कार जळून खाक झाली. या दुर्घटनेमध्ये कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा कारचालक आगीमुळे गाडीतच अडकला होता. ही भीषण दुर्घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भरधाव वेगानं जाणाऱ्या गाडीतून अचानक धूर आला आणि आग लागली. या आगीनं काही क्षणांत रौद्र रुप धारण केलं. गाडी लॉक असल्यानं कार चालकाला गाडीतून बाहेर पडणं शक्य झालं नाही. कार चालकानं गाडीतून बाहेर पडण्यासाठी धडपड केली मात्र ही धडपड अपयशी ठरली आणि त्याचा होरपळून मृत्यू झाला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीनं आगीचा भडका उडाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान या प्रकरणी कार चालक कोण आहे याची माहिती घेण्याचं काम सुरू आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. अंगावर काटा आणणारा आगीचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे वाचा-राहुल गांधींनी कर्जबुडव्यांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरुन लोकसभेत गदारोळ हे वाचा-भारतीय गोलंदाजाच्या घरी लगीनघाई! कोरोनाच्या धाकात उरकला साखरपुडा
    Published by:Akshay Shitole
    First published:

    पुढील बातम्या