मराठी बातम्या /बातम्या /देश /

दिल्लीतल्या CBI च्या मुख्यालयात आग; एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण, सुदैवानं जीवितहानी टळली

दिल्लीतल्या CBI च्या मुख्यालयात आग; एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण, सुदैवानं जीवितहानी टळली

CBI Office Fire: आज सकाळी केंद्रीय तपास यंत्रणेच्या मुख्यालयात आग लागली.

CBI Office Fire: आज सकाळी केंद्रीय तपास यंत्रणेच्या मुख्यालयात आग लागली.

CBI Office Fire: आज सकाळी केंद्रीय तपास यंत्रणेच्या मुख्यालयात आग लागली.

  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली,08 जुलै: आज सकाळी केंद्रीय तपास यंत्रणेच्या मुख्यालयात आग लागली. सुदैवानं या आगीत कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. जवळपास एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

दिल्ली फायर सर्व्हिसेसचे प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितले की, सकाळी 11.36 वाजता लोधी रोड येथील सीबीआय मुख्यालयातून फोन आला. मुख्यालयात आग लागल्याची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झालं. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हेही वाचा- भररस्त्यात व्यावसायिकावर गोळ्यांचा वर्षाव, गोळीबाराचा LIVE VIDEO

इलेक्ट्रीक केबल किंवा ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्टसर्किट झाल्यानं ही आग लागल्याचा संशय गर्ग यांनी व्यक्त केला आहे.

First published:

Tags: CBI, Delhi, Fire