मराठी बातम्या /बातम्या /देश /

विमान हजारो फूट उंचीवर अन् प्रवाशाच्या मोबाईलमधून निघू लागला धूर; क्रू मेंबरने उचललं मोठं पाऊल

विमान हजारो फूट उंचीवर अन् प्रवाशाच्या मोबाईलमधून निघू लागला धूर; क्रू मेंबरने उचललं मोठं पाऊल

विमान हजारो फूट उंचीवर आकाशात उडत असताना केबिन क्रूच्या सदस्याला प्रवाशाच्या मोबाईलमधून धूर निघताना दिसून आलं. त्यांनी तत्काळ अग्निशमन यंत्राच्या मदतीने स्थिती आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.

  • Published by:  Pravin Wakchoure

नवी दिल्ली, 15 एप्रिल : मोबाईल स्फोटांच्या घटना आता काही नवीन राहिल्या नाहीत. याचे अनेक व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत. यातन अनेकांना शारीरिक इजा झाल्याचं देखील समोर आलं होतं. अशीच एक मोबाईल स्फोटाची घटना विमानात घडली आहे. दिब्रुगडहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात झालेल्या एका घटनेमुळे शेकडो प्रवाशांचे जीव धोक्या आले होते, अशी माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) दिली आहे.

DGCA च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, इंडिगोच्या विमान क्रमांक 6E 2037 ने गुरुवारी दिब्रुगडहून दिल्लीला उड्डाण केले. उड्डाण होऊन काही वेळ झाला होता आणि विमान हजारो फूट उंचीवर आकाशात उडत असताना केबिन क्रूच्या सदस्याला प्रवाशाच्या मोबाईलमधून धूर निघताना दिसून आलं. त्यांनी तत्काळ अग्निशमन यंत्राच्या मदतीने स्थिती आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.

पत्नीच्या चुकीमुळे घटस्फोट झाल्यास पोटगीचा अधिकार संपतो का? वाचा उच्च न्यायालय काय म्हणालं

बॅटरीतून निघत होता धूर

इंडिगोने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, विमान प्रवासादरम्यान एका प्रवाशाच्या मोबाईलची बॅटरी गरम झाली आणि हळूहळू जळू लागली होती. आमचे केबिन क्रू मेंबर्स कोणतीही अप्रिय घटना हाताळण्यासाठी पूर्णपणे प्रशिक्षित आहेत आणि त्यामुळेच त्यांनी कोणतीही भीती न बाळगता परिस्थिती ताबडतोब हाताळली. अपघात वेळीच टळला असून कोणत्याही प्रवासी व मालमत्तेचे नुकसान झाले नाही.

दुपारी विमान सुखरूप उतरले

DGCA ने दिलेल्या माहितीनुसार, दिब्रुगडहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटमध्ये हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे, मात्र विमानातील क्रू मेंबरच्या सतर्कतेमुळे कोणताही अनुचित प्रकार टळला. यात कोणत्याही प्रवाशाचे किंवा विमानाचे कोणतेही नुकसान झाले नाही. दुपारी 12.45 च्या सुमारास विमान दिल्लीत सुरक्षितपणे उतरले.

Shocking Video: जवळ उभा असूनही CISF जवान नाही वाचवू शकले प्राण; मेट्रो स्टेशनवरुन उडी घेतलेली तरुणी कोण?

सॅमसंगच्या मोबाईलवर पाच वर्षांपूर्वी बंदी

विमान प्रवासादरम्यान मोबाईलला आग लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2016 मध्ये अशाच एका घटनेनंतर सॅमसंग गॅलेक्सी नोट 7 मोबाईल विमानात नेण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर या फोनमध्ये आग आणि स्फोटाच्या अनेक घटना घडल्या. कंपनीची घटती प्रतिमा आणि विक्री पाहता हा फोन पूर्णपणे बंद करण्यात आला होता. म्हणूनच विमानात चढण्यापूर्वी प्रवाशांना अनेक प्रकारच्या सूचना दिल्या जातात, ज्यामध्ये विमानात कोणतीही धोकादायक उपकरणे किंवा उत्पादन घेण्यास मनाई आहे.

First published:

Tags: Airplane, Mobile, Smart phone