मराठी बातम्या /बातम्या /देश /

शाई तयार करणाऱ्या कारखान्यात भीषण अग्नितांडव, आगीची भीषण दाखवणारा VIDEO समोर

शाई तयार करणाऱ्या कारखान्यात भीषण अग्नितांडव, आगीची भीषण दाखवणारा VIDEO समोर

शाई तयार करणाऱ्या कंपनीमध्ये ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आग लागल्यानंतर कंपनीत काम करणारे कर्मचारी बाहेर पडले.

    नोएडा, 25 ऑक्टोबर : मुंबईतील सिटी मॉलला लागलेली आग नियंत्रणात येत असतानाच आणखीन एक भयंकर अग्नितांडव समोर आला आहे. दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशमधील नोएडामधील एका इमारतीत भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीनं रौद्र रुप धारण केलं. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. शाई तयार करणाऱ्या कंपनीमध्ये ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आग लागल्यानंतर कंपनीत काम करणारे कर्मचारी बाहेर पडले त्यामुळे मोठी जीवितहानी टळली मात्र मोठ्या प्रमाणात साहित्याचं नुकसान झालं आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलं नाही मात्र अग्निशमन दलानं या आगीवर नियंत्रण मिळवलं असून कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. हे वाचा-56 तासांपासून धुमसतोय मुंबईतला सिटी मॉल, अग्निशमन दलाचे 6 जवान जखमी मुंबईतही नागपाडा इथे गुरुवारी रात्री उशिरा सिटी मॉलमध्ये दुसऱ्या मजल्यावर मोबाईलच्या दुकानाला आग लागली. तब्बल 56 तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळालं असून आतापर्यंत अग्निशमन दलाचे 6 जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर या मॉलमधील साहित्य जळून खाक झालं. 56 तास ही आग मॉलमध्ये धुसमत होती. गुरुवारी रात्री उशिरा लागलेल्या आगीनं रौद्र रुप धारण केलं आणि हाहाकार माजला. बघता बघता संपूर्ण मॉल आगीच्या भक्ष्यस्थानी आला.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Uttar pradesh

    पुढील बातम्या