#BREAKING दिल्लीत पुन्हा अग्नितांडव! भीषण आगीत होरपळून 9 जणांचा मृत्यू

#BREAKING दिल्लीत पुन्हा अग्नितांडव! भीषण आगीत होरपळून 9 जणांचा मृत्यू

दिल्लीतील किराडी भागातील एका दुमजली इमारतीला लागली होती आग.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास (प्रतिनिधी) नवी दिल्ली, 23 डिसेंबर: राजधानी दिल्ली पुन्हा एकदा भीषण आगीनं हादरली. मध्यरात्रीच्या सुमारास किराडी भागात कापडाच्या गोदामाला आग लागली. ही आग काही मिनिटांत या आगीनं रौद्र रुप धारण केलं. आगीत होरपळून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. तळमजल्यावर लागलेल्या आगीनं रौद्र रुप धारण करत इमारतीचा दुसरा मजला गाठला. आगीमुळे सिलेंडरचा स्फोट झाला आणि आगीचा भडका उडाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं होतं. साधारण साडे चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं. या इमारतीमध्ये एकच शिडी असल्याची माहिती समोर आली. आग प्रतिबंध कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याचं समोर आलं आहे. दरम्यान या आगीत गोदामासह घरातील सर्व सामान जळून खाक झालं आहे.

रौद्र रुप धारण केल्यानंतर इमारतीचा पहिला आणि दुसरा मजला आगीच्या भक्षस्थानी आला. या इमारतीत असणाऱ्या सिलेंडचा स्फोट झाल्यानं आग जास्त भडकल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटामुळे घराची एक भिंत कोसळून दुर्घटना घडली. दरम्यान मध्य रात्री आगीवर नियंत्रण मिळवताना तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. कुलिंग ऑफरेशन दरम्यान 9 जणांचे मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान आगीत जखमी झालेल्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 12 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. दिल्लीत इतकी भीषण आग लागण्याची गेल्या काही दिवसांमधली दुसरी घटना आहे.

राजधानी दिल्लीतील झाशी रोडवर 8 नोव्हेंबर रोजी सकाळी अनाज मंडीमध्ये पहाटे पाचच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीमध्ये 43 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. या घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला होता. त्यावेळी तिथल्या इमारतीमधून 59 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 23, 2019 07:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading