Home /News /national /

दिल्लीत भीषण आग, एकाचा होरपळून मृत्यू, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 32 गाड्या

दिल्लीत भीषण आग, एकाचा होरपळून मृत्यू, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 32 गाड्या

देशाची राजधानी दिल्लीतील (Delhi)पटपडगंज औद्योगिक वसाहतीत (Patparganj Industrial Area) गुरुवारी सकाळी भीषण आग लागली

    नवी दिल्ली,9 जानेवारी: देशाची राजधानी दिल्लीतील (Delhi)पटपडगंज औद्योगिक वसाहतीत (Patparganj Industrial Area) गुरुवारी सकाळी भीषण आग लागली आहे. आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दिलेली माहिती अशी की, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 32 गाड्या (Fire Tender)दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, नोएडाच्या सेक्टर 24 मधील ESI हॉस्पिटलमध्ये गुरुवारी सकाळी आग लागली. हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये आग लागली असून मोठा गोंधळ उडाला आहे. आगीची सूचना मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. हॉस्पिटलमधील सर्व रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बाहेर काढण्यात आले आहे. कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पंतप्रधान निवासस्थानी लागली होती आग पंतप्रधान कार्यालयाला डिसेंबर महिन्यात आग लागली होती. PMO अर्थात पंतप्रधान कार्यालयाला संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास आग लागली. सध्या तिथे अग्निशमन दलाच्या 9 गाड्यांच्या मदतीने अर्ध्या तासाच्या आत आगीवर नियंत्रणात मिळवण्यात आले. 7, लोककल्याण मार्ग यावर असणाऱ्या पंतप्रधानांच्या निवासस्थानीच आग लागल्याने खळबळ उडाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अधिकृत निवासस्थानी नेहमीच दक्षता म्हणून आपत्कालीन सेवा उपलब्ध असतात. अग्निशमन दलाच्या काही गाड्या 7, लोककल्याण मार्गावर नेहमी तैनात असतात. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान कार्यालयाकडून या आगीच्या घटनेबद्दल ट्वीट करण्यात आले होते. ही आग किरकोळ स्वरूपाची असून नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे PMO कडून सांगण्यात आले होते. इराकमधील अमेरिकेच्या दुतावासाजवळ पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Delhi

    पुढील बातम्या