Home /News /national /

नोएडाच्या ESI हॉस्पिटलमध्ये लागली आग, रुग्णांसह नातेवाईकांना असे काढले बाहेर

नोएडाच्या ESI हॉस्पिटलमध्ये लागली आग, रुग्णांसह नातेवाईकांना असे काढले बाहेर

नोएडाच्या सेक्टर 24 मधील ESI हॉस्पिटलमध्ये गुरुवारी सकाळी आग लागली. हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये आग लागली असून मोठा गोंधळ उडाला आहे.

    नोएडा,9 जानेवारी: नोएडाच्या सेक्टर 24 मधील ESI हॉस्पिटलमध्ये गुरुवारी सकाळी आग लागली. हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये आग लागली असून मोठा गोंधळ उडाला आहे. आगीची सूचना मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. हॉस्पिटलमधील सर्व रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बाहेर काढण्यात आले आहे. कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. झपाट्याने पसरली आग.. मिळालेली माहिती अशी की, हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये ही लाग लागली आहे. आगीच्या ज्वाला आणि धूराचे लोट मोठ्या प्रमाणात बाहेर निघत आहेत. आग झपाट्याने पसरली असून तिच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न करत आहेत. हॉस्पिटलमधील सर्व रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. दिल्लीत भीषण आग, एकाचा होरपळून मृत्यू, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 32 गाड्या आगीचे कारण अद्याप समोर आले नसून शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न करत आहेत. हॉस्पिटलमध्ये बसवण्यात आलेली फायर फाइटिंग सिस्टिम कार्यरत नसल्याचे समोर आले आहे. सुरतमध्ये मोठा अपघात, सिलिंडर भरलेल्या ट्रकला भीषण आग, स्कूल बसही जळून खाक दरम्यान, दिल्लीतील (Delhi)पटपडगंज औद्योगिक वसाहतीत (Patparganj Industrial Area) गुरुवारी सकाळी भीषण आग लागली आहे. आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दिलेली माहिती अशी की, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 32 गाड्या (Fire Tender)दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या