AIIMS रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डला आग आटोक्यात

AIIMS रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डला आग आटोक्यात

दिल्लीतलं मोठं रुग्णालय AIIMS च्या emergency वॉर्डला आग लागल्याचं वृत्त आलंय. या रुग्णालयात दुसऱ्या मजल्यावर असलेल्या इमर्जन्सी वॉर्डला आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. माजी केंद्रीय अरुण जेटली हेदेखील एम्समध्येच दाखल आहेत.

  • Share this:

दिल्ली, 17 ऑगस्ट : दिल्लीतलं मोठं रुग्णालय AIIMS च्या emergency वॉर्डला आग लागल्याचं वृत्त आलंय. या रुग्णालयात दुसऱ्या मजल्यावर असलेल्या इमर्जन्सी वॉर्डला आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. ही आग पहिल्या मजल्यापर्यंत आली आहे. माजी केंद्रीय अरुण जेटली हेदेखील एम्समध्येच दाखल आहेत. त्यांच्या वॉर्डमध्ये नेमकी कसी परिस्थिती आहे याची माहिती अद्याप आलेली नाही. ही बातमी अपडेट होत आहे.

आमचे दिल्ली प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी दिलेल्या माहितीनुसार, AIIMS ची आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या 30 च्या वर गाड्या आग विझवण्याचे प्रयत्न करत होत्या. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, ही आग आता आटोक्यात आली आहे. 35 आगीचे बंब आणि 10 लहान वाहनांच्या मदतीने आग विझविण्यामध्ये यश आलं. प्राथमिक माहिती मिळाली त्यानुसार, एम्सच्या दुसऱ्या माळ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ती पहिल्या मजल्यापर्यंत पसरत गेली. गेल्या चार ते पाच दिवसापासून दुसऱ्या माळ्यावरील लॅब मध्ये वीज जोडणीचे काम सुरू होतं. त्यामुळे शॉर्ट सर्किट झालं असावं.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भात केलेलं ट्वीट..

--------------------------

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानी पत्रकाराने विचारलं, चर्चा कधी? भारतीय मुत्सद्द्यांनी असं केलं गप्प

 जम्मू काश्मीरमध्ये सैन्याला High Alert; शत्रू करू शकतो हल्ला

----

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: AIIMS
First Published: Aug 17, 2019 05:28 PM IST

ताज्या बातम्या