...आणि पाहता पाहता स्थानकात उभ्या असलेल्या पॅसेंजरला लागली आग, पाहा VIDEO

...आणि पाहता पाहता स्थानकात उभ्या असलेल्या पॅसेंजरला लागली आग, पाहा VIDEO

स्थानकात उभ्या असलेल्या पॅसेंजरला अचानक लागलेल्या आगीमुळे रेल्वे स्थानकात मोठा गोंधळ उडाला.

  • Share this:

जोधपूर, 21 मे : राजस्थानमधील जोधपूर रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या पॅसेंजर गाडीच्या एका बोगीनं रात्री अचानक पेट घेतला. बघता बघता आगीनं रौद्र रुप धारण गेलं आणि आग बोगीभर पसरली. या आगीमध्ये पॅसेंजर ट्रेनचे दोन डबे जळून खाक झाले आहेत. अचानक लागलेल्या आगीमुळे रेल्वे स्थानकात मोठा गोंधळ उडाला होता.

मुख्य स्थानकामागच्या वेसिंग लाईनमध्ये उभ्या असलेल्या ट्रेनच्या बोगीला ही आग लागली आणि साधारण 30 मिनिटं ही आग धुमसत होती. रेल्वेच्या दोन्ही डब्यातून जळालेल्या ज्वाळांना पाहून जीआरपी आणि पोलिसांसह अग्निशमन दलाच्या घटनास्थळी पोहोचलं. अग्निशमन दलानं या आगीवर नियंत्रण मिळवलं. या दुर्घटनेत कोणतीही मानवी जीवितहानी झालेली नाही अशी माहिती समोर आली आहे.

हे वाचा-'Amphan' चं प. बंगाल-ओडिशामध्ये थैमान, कोट्यवधीचं नुकसान तर 12 जणांचा मृत्यू

जोधपूरहून बीकानेरला जाण्यासाठी पॅसेंजर ट्रेन उभी होती. या रेल्वे गाडीच्या बोगीनं अचानक पेट घेतला. अग्निशमन दलाचे सीएफओ संजय शर्मा यांनी सांगितले की कंट्रोल रूमच्या माहितीनुसार नागौरी गेट व शास्त्री नगर येथून अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांनी मिळून या आगीवर नियंत्रण मिळवलं. ट्रेनच्या बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागल्याचं सांगितलं जात आहे. मात्र रेल्वेच्या डब्यात आग लागल्याची घटना घडल्यानंतर रेल्वेनेही आगीचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. निर्जन ठिकाणी पार्क केलेल्या ट्रेनला कशी आग लागली याचा शोध घेतला जात आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणातील चौकशीनंतरच आगीचे नेमकं कारण समोर येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

हे वाचा-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा पुन्हा हल्ला, BSFचे 2 जवान शहीद

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 21, 2020, 9:15 AM IST

ताज्या बातम्या