सुरत: 10 मजली कपड्यांच्या मार्केटला भीषण आग, 57पेक्षा जास्त अग्निशमन गाड्या दाखल

सुरत: 10 मजली कपड्यांच्या मार्केटला भीषण आग, 57पेक्षा जास्त अग्निशमन गाड्या दाखल

अग्निशमन दलाचे 200 जवान आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहे. सुरत, बारडोली, कुंभारिया, होळीवाला, हजीरा येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळावर आहे.

  • Share this:

सुरत, 21 जानेवारी : गुजरातमधील सुरत इथे रघुवीर टेक्सटाइल मार्केटमध्ये भीषण आग लागली आहे. पुना-कुंभारिया रोड परिसरात लागलेल्या या आगीने रौद्र रुप घेतल्याचं सांगण्यात येत आहे. अग्निशामक दलाच्या 57 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे 200 जवान आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहे. सुरत, बारडोली, कुंभारिया, होळीवाला, हजीरा येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळावर आहे.

सरोली परिसरातील संपूर्ण 10 मजली कापड्याचा बाजार आगीने भडकला आहे. सध्या आगीचे कारण समजू शकलेले नाही. काही दिवसांपूर्वी या बाजाराच्या 9 व्या मजल्यावर आग लागली होती. त्याचबरोबर या घटनेत झालेल्या जीवितहानीची माहितीही या क्षणी जाहीर केलेली नाही. पण आग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे विझवण्यामध्ये अडचण येत आहे.

यापूर्वीही झाले आहेत असे अपघात

गुजरातमधील सूरत इथे अलीकडेच गॅस सिलिंडर भरलेल्या ट्रकमध्ये स्फोट झाला. ओलापड भागात ही घटना घडली. ट्रकच्या आगीत एका स्कूल बसलाही धडक दिली. बसमधील सर्व शाळकरी मुलांना सुखरुप बाहेर काढले गेले ही विशेष बाब आहे. या अपघातात ट्रक, बस, टेम्पो व ऑटो जळून खाक झाले.

यापूर्वी सुरतच्या पूना परिसरातील बाजारात एका बहुमजली इमारतीला आग लागली. जे बर्‍यापैकी प्रयत्नांनंतर विझू शकले. चारोली गावाजवळील कुंभारिया रोडवरील रघुवीर सालियम मार्केटमध्ये भीषण आगीत ही घटना घडली. त्यावेळी घटनास्थळी 9 फायर इंजिने बसविण्यात आल्या होती. सहाव्या मजल्यावरील आग कित्येक तासांनंतर विझू शकली.

First published: January 21, 2020, 8:01 AM IST

ताज्या बातम्या