Home /News /national /

दिल्लीत भीषण अग्नितांडव, इमारत धुमसली, अनेक लोक अडकल्याची भीती

दिल्लीत भीषण अग्नितांडव, इमारत धुमसली, अनेक लोक अडकल्याची भीती

दिल्लीच्या मुंडका परिसरात एका इमारतीला आज भीषण आग लागली. या आगीत होरपळून एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    नवी दिल्ली, 13 मे : देशाची राजधानी दिल्लीत आगीची (Delhi Fire) मोठी दुर्घटना घडली आहे. दिल्लीच्या मुंडका (Mundka) परिसरात एका इमारतीला आज भीषण आग लागली. या आगीत होरपळून एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेचा मृतदेह बचाव पथकाच्या जवानांनी ताब्यात घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित इमारतीत आणखी काही नागरिक अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. घटनास्थळी बचाव पथकाची टीम दाखल झाली असून युद्धपातळीवर अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. संबंधित घटना ही मुंडका मेट्रो स्टेशन (Mundka Metro Station) जवळच घडली आहे. आगीची घटना ही आज संध्याकाळी साडेचार ते पावणे पाच वाजेच्या सुमारास घडली. मुंडका परिसरात इमारतीत आग लागल्याची माहिती पोलिसांना सर्वात आधी मिळाली. एका पीसीआर कॉलच्या माध्यमातून पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच तातडीने स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर अग्निशमन दलाच्या गाड्यादेखील घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर लगेच बचाव कार्य सुरु झालं. पोलिसांनी इमारतीच्या खिडक्या फोडून आतमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढलं आणि जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. (2 बायकांसह सुखी संसार करणाऱ्या Salim Khan यांच्या दोन्ही मुलांवर का आली घटस्फोटाची वेळ?) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सबंधित तीन मजली इमारत ही कमर्शिअल इमारत आहे. तिथे वेगेवगळ्या खाजगी कंपन्यांचे कार्यालये आहेत. इमारतीच्या पहिल्या माळ्यावर सर्वात आधी आग लागली. त्यानंतर ही आग वरच्या मजल्यांवर धुमसत गेली. ही आग नेमकी का लागली? याबाबतची माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही. पण आगीच्या घटनेनंतर इमारतीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम अद्यापही सुरुच आहे. घटनास्थळी अग्निशन दलाच्या दहा पेक्षा जास्त गाड्या आहेत. तसेच रुग्णवाहिका देखील आहे. बचावपथकाचं प्रचंड वेगाने काम सुरु आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या