मोठी बातमी! कोविड-19 रुग्णालयाच्या ICU मध्ये अग्नितांडव, 8 रुग्णांचा होरपळून मृत्यू
ICUमध्ये कोरोनावर उपचार घेत असलेल्या 8 रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला आहे. आगीत होरपळून मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अहमदाबाद, 06 ऑगस्ट : कोरोनाचं संकट असतानाच आणखी एक भीषण दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. कोरोनाग्रस्त रुग्णालयात भीषण आग लागली. या आगीत 8 कोरोनाग्रस्तांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. आगीनं रौद्र रुप धारण केल्यानं रुग्णालयात मोठी खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार गुजरातच्या अहमदाबाद इथे नवरंगपुरा परिसरातील श्रेय रुग्णालयात भीषण आग लागली. आगीची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी तातडीनं पावलं उचललं मात्र तोपर्यंत आगीनं रौद्र रुप धारण केलं होतं. त्यामुळे या आगीत होरपळून ICU मधील 8 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
श्रेय रुग्णालय हे कोविड-19 रुग्णांसाठी करण्यात आलं होतं. या रुग्णालयात अचानक शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ICUमध्ये कोरोनावर उपचार घेत असलेल्या 8 रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला आहे. आगीत होरपळून मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू असून उरलेल्या 35 कोरोना रुग्णांना तातडीनं दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. रात्री 2.30 वाजता शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.