Home /News /national /

VIDEO : ONGC मध्ये आगीनंतर भीषण स्फोट, आकाशात दिसले आगीचे गोळे, 4 जण बेपत्ता

VIDEO : ONGC मध्ये आगीनंतर भीषण स्फोट, आकाशात दिसले आगीचे गोळे, 4 जण बेपत्ता

कोरोना आणि लॉकडाऊनंतर हळूहळू सगळं पूर्वपदावर येत असताना मोठ्या दुर्घटना होत असल्याचं समोर येत आहे.

    सूरत, 24 सप्टेंबर : कोरोना आणि लॉकडाऊनंतर हळूहळू सगळं पूर्वपदावर येत असताना मोठ्या दुर्घटना होत असल्याचं समोर येत आहे. लॉकडाऊन काळात बंद असलेल्या प्लॅन्टपूर्वपदावर येत असताना त्यामध्ये अनेक दुर्घटना घडत असल्याचं गेल्या काही दिवसांत समोर आलं आहे. अशीच एक घटना ONGC प्रकल्पात घडली आहे. गुजरातच्या सूरत इथल्या तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन (ONGC) मध्ये बुधवारी रात्री उशिरा अचानक आग लागली. आगीनं हळूहळू रौद्र रूप धारण केलं आणि आगीचे लोळ काळात दिसायला लागले. दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. या प्लॅन्टमध्ये किती लोक काम करत होते? कोणती जीवितहानी झाली की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हे वाचा-12 वर्षांच्या मुलानं दीड वर्षांच्या चिमुकल्याला मालगाडीखाली फेकलं, थरारक VIDEO हा प्लान्ट स्वयंचलित असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान स्फोटानंतर 4 जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता की आगीचे मोठे गोळे दिसत आहेत. त्यावरून ही आग किती मोठी असेल याची कल्पना आपण करू शकता. याआधी याच प्लॅन्टमध्ये 2015 रोजी देखील आग लागली होती. या आगीत 15 जणांचा होरपळून त्यावेळी मृत्यू झाला होता. आता ही आग नेमकी कशामुळे लागली याचं अद्याप निदान समोर येऊ शकलं नाही. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारणही शोधणं सुरू आहे. आगीमुळे परिसरात धुराचे लोळ दिसत आहेत. आग लागल्यानंतर ONGC प्लान्टमधील 4 जण बेपत्ता झाले असून सध्या त्यांचा शोध सुरू आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Gujrat, Surat

    पुढील बातम्या