Home /News /national /

दिल्लीतील Maharashtra सदनाला लागलेली आग आटोक्यात, सुदैवानं जीवितहानी नाही

दिल्लीतील Maharashtra सदनाला लागलेली आग आटोक्यात, सुदैवानं जीवितहानी नाही

Fire at Maharashtra Sadan: देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) आज सकाळी महाराष्ट्र सदनाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

    नवी दिल्ली, 26 जुलै: देशाची राजधानी दिल्लीत आज सकाळी महाराष्ट्र सदनाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. काही वेळातचं अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली आहे. महाराष्ट्र सदनला आग नेमकी कशामुळे लागली? याचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. ही बातमी लिहिण्यापर्यंत सभागृहात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं महाराष्ट्र सदनातील लोकांना बाहेर काढलं आहे. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट तयार झाले होते. पण सुदैवाची बाब म्हणजे यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदनातील काही वस्तूंनी पेट घेतल्यानं किरकोळ नुकसान झालं आहे. आगीच्या नेमक्या कारणाचा शोध घेतला जात आहे. (ही बातमी अपडेट होतं आहे....)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Delhi, Fire, Maharashtra

    पुढील बातम्या