Air Strikeनंतर पाकला भलतीच काळजी, अजब कारण देत भारताच्या वैमानिकांवर FIR दाखल

Air Strikeनंतर पाकला भलतीच काळजी, अजब कारण देत भारताच्या वैमानिकांवर FIR दाखल

पाकच्या वन विभागाने वन संपत्ती नष्ट केल्याचा दावा करत भारतीय हवाई दलाच्या अज्ञात वैमानिकांवर शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 08 मार्च: भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हल्ला करत दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. भारताच्या या  Air स्टाईकनंतर दोन्ही देशातील तणाव अद्याप कमी झालेला नाही. अशातच पाकच्या वन विभागाने वन संपत्ती नष्ट केल्याचा दावा करत भारतीय हवाई दलाच्या अज्ञात वैमानिकांवर शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय हवाई दलाच्या या कारवाईमुळे बालाकोट येथील पर्यावरणाचे नुकसान झाल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

पाकिस्तानमधील एक्स्प्रेस न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार अज्ञात भारतीय वैमानिकांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या या कारवाईत बालाकोट येथील 19 झाडांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे काही दिवासांपूर्वी संयुक्त राष्ट्र संघात भारताविरुद्ध तक्रार करणार असल्याचे पाकने म्हटले होते. पाकिस्तानचे पर्यावरण मंत्री अमिन असलम यांनी सांगितले की, भारतीय जेट विमानांनी पर्यावरणाचे नुकसान केले आहे. भारताच्या हवाई स्टाईकमुळे वन संपत्तीचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी संयुक्त राष्ट संघात 47/37 नियमानुसार तक्रार करणार आहे.

लष्करी कारवाईत जर पर्यावरणाचे नुकसान झाले तर आंतरराष्ट्रीय नियमानुसार तो गुन्हा मानला जातो, असे पाकिस्तानने म्हटले आहे. भारताची ही कारवाई म्हणजे इको Terrorism आहे. यामुळे पाकिस्तानच्या वन संपत्तीचे नुकसान झाल्याचे असलम यांनी सांगितले.

भारतीय हवाई दलाने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या मुख्य तळावर हवाई हल्ला केला होता. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी जैशने घेतली होती. त्यानंतर 13व्या दिवशी भारताने पाकिस्तानात घुसून जैशच्या तळांवर हल्ला केला होता.

VIDEO : अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा आणि सुप्रिया सुळे...कसं आहे नणंद-भावजयमधील बाँडिंग?

First published: March 8, 2019, 5:23 PM IST
Tags: pakistan

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading