07 जानेवारी: 500 रूपयात आधार कार्डची सगळी गोपनीय माहिती मिळू शकते अशी धक्कादायक बातमी देणाऱ्या ट्रिब्यून वर्तमानपत्राच्या रचना खैराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही युआयडीएआनेच दाखल केला आहे.
कुणाच्याही आधार कार्डची गोपनीय माहिती 500 रूपयात मिळते अशी माहिती रचनाने छापली होती. तसंच अजून 300 रूपये दिल्यावर हे आधार कार्ड प्रिंट करण्याचं सॉफ्टवेअरही मिळतं असंही या बातमीत म्हटलं होतं. 3 जानेवारीला ही बातमी प्रकाशित झाली होती. त्यानंतर या बातमीमुळे देशभर खळबळ माजली होती. लगेच आधारच्या युआयडिआयएने याविरूद्ध स्टेटमेंट जाहीर केलं होतं. आधारची माहिती पूर्णपणे सुरक्षित असून ही बातमी खोटी असल्याचा दावा केला आहे. तर रचना खैरा या रिपोर्टर विरुद्धच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आधारबद्दल होत असलेल्या अपप्रचाराचा विरोधही करण्यात आला आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावरती या गुन्ह्याविरूद्ध सरकारविरूद्ध प्रचंड टीका करण्यात येते आहे. त्यामुळे आधार योजनेची सुरक्षितता नक्की किती आहे यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.