लॉकडाऊनमध्ये घरात केलं चित्रपटाचं शूटिंग, भाजप ज्येष्ठ नेत्याविरोधात गुन्हा दाखल

लॉकडाऊनमध्ये घरात केलं चित्रपटाचं शूटिंग, भाजप ज्येष्ठ नेत्याविरोधात गुन्हा दाखल

लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवत चित्रपटाचे शूटिंग केल्याच्या प्रकरणात भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि JDU चे माजी खासदार असणाऱ्या विश्वमोहन कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे

  • Share this:

सुपौल, 31 मार्च : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची (Corona Lockdown) घोषणा करूनही अनेकांनी याचं उल्लंघन केले आहे. बिहारच्या सुपौलमध्ये चित्रपटाचे शूटिंग केल्याच्या प्रकरणात भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि JDU चे माजी खासदार असणाऱ्या विश्वमोहन कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. इश्क दीवाना या चित्रपटाचे शूटिंग पीपरा या भागातील कटैया गांवात असणाऱ्या त्यांच्या घरामध्ये करत होते. एसएसपी मनोज कुमार यांनी ही कारवाई केली आहे.

घरामध्ये सुरू होतं चित्रपटाचे शूटिंग

दरम्यान देशभरात 21 दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत पूर्व मंत्री विश्वमोहन कुमार यांनी त्यांच्या घरी शूटिंगसाठी भोजपुरी चित्रपटाच्या निर्मात्याला घरीच आमंत्रित केले. त्या्नंतक कटैया गावामध्ये चित्रपटाची शूटिंग सुरू होती. धक्कादायक बाब म्हणजे हे शूटिंग पाहण्यासाठी शेकडो लोकांनी गर्दी केली होती. कुमार यांच्या या बेपर्वाईमुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका केली जात आहे.

(हे वाचा-PM Care Fund नाही तर या संस्थांना केली सैफ अली खान आणि करीना कपूरने मदत)

स्थानिक पातळीवर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र एसएसपी मनोज कुमार यांनी या प्रकरणाचा छडा लावला. पीपरा पोलीस ठाण्यात विश्वमोहन कुमार आणि चित्रपट निर्मात्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या शूटिंगदरम्यानचे सर्व कॅमेरा जप्त केले आहेत तर अधिक तपास केल्यानंतर प्रकरणातील सर्वांना अटक करण्यात येणार आहे.

(हे वाचा-कनिका कपूरबाबत नवी माहिती आली समोर, डॉक्टरांनी सांगितली सत्य परिस्थिती)

गावातील नागरिकांनी तक्रार केल्यानंतर स्वत: एसएसपी यांनी गावामध्ये येऊन प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आले आहे. अशा प्रकरणांवर गंभीर कारवाई केल्यास सामान्य जनतेलाही लॉकडाऊनचे महत्त्व लक्षात येईल, अशी अपेक्षा एसडीओ क्यूम अंसारी यांनी व्यक्त केली आहे.

First published: April 1, 2020, 7:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading