लॉकडाऊनमध्ये गावकऱ्यांनी काढली गायीची अंत्ययात्रा, पाहा नंतर काय झालं...

लॉकडाऊनमध्ये गावकऱ्यांनी काढली गायीची अंत्ययात्रा, पाहा नंतर काय झालं...

कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशातील अलीगड येथे एक थक्क करणारी घटना समोर आली आहे.

  • Share this:

अलीगड, 23 मे: कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशातील अलीगड येथे एक थक्क करणारी घटना समोर आली आहे.

अलीगडमधील जवा येथील गावकऱ्यांनी गायीची अंत्ययात्रा काढून सोशल डिस्टसिंग आणि जमावबंदीच्या कायद्याचं उल्लंघन केलं. या प्रकरणी पोलिसांनी 150 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात जवळपास 100 महिला आणि 50 पुरुषांचा समावेश आहे.

हेही वाचा..Lockdown 4.0: रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

मिळालेली माहिती अशी की, मैमडी येथील रहिवाली दिनेश चंद्र शर्मा यांच एक दुकान आहे. दुकानासमोरच गुरुवारी सकाळी एक गाय दगावली होती. जमावबंदीचे आदेश असतानाही गावकऱ्यांनी गायीची अंत्ययात्रा काढून गायीला अखेरचा निरोप देण्याचा निर्णय घेतला. धक्कादायक म्हणजे अंत्ययात्रेत गावातील महिलांची संख्या जास्त होती. अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या एकाही महिलेने चेहऱ्यावर मास्क लावला नव्हता. या अंत्ययात्रेमुळे सोशल डिस्टसिंगचाही चांगलाच फज्जा उडाला.

दुसरीकडे, गौधा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अभय कुमार शर्मा व सहाय्यक पोलिस निरीक्षक धर्मेन्द्र सिंह यांनी गायीची अंत्ययात्रा काढल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडी जवा गाव गाठलं. पोलिसांना पाहताच गावकऱ्यांनी गायीचा मृतदेह रस्त्यावरच सोडून धूम ठोकली.

हेही वाचा...रावसाहेब दानवेंचे जावई, माजी आमदार हर्षवर्धन जाधवांचा राजकीय संन्यास

पोलिसांनी गायीचा मृतदेह जेसीबी मशीन मागवून दफन विधी केला. जमावबंदी कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसानी दिनेश, रूपेश, सतीश, भूरा, रावेन्द्र, दलवीर, जतिन, अमर सिंह, इक्का, सौनू, दीपक, गुड्डू, राकेश, मौनू, सोनिया, जलधारा, शांति, नेमवती, गायत्री, शीला (सर्व रा. मेमड़ी) यांच्यासह 90 महिला आणि 35 पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

First published: May 23, 2020, 3:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading