मराठी बातम्या /बातम्या /देश /काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात गुन्हा, PM Cares फंडबाबत पसरवला संभ्रम

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात गुन्हा, PM Cares फंडबाबत पसरवला संभ्रम

काँग्रेसच्या ट्विटर (INC) हॅण्डलवरुन पीएम केअर फंडाबाबत चुकीचे ट्वीट करण्यात आलं होतं.

काँग्रेसच्या ट्विटर (INC) हॅण्डलवरुन पीएम केअर फंडाबाबत चुकीचे ट्वीट करण्यात आलं होतं.

काँग्रेसच्या ट्विटर (INC) हॅण्डलवरुन पीएम केअर फंडाबाबत चुकीचे ट्वीट करण्यात आलं होतं.

नवी दिल्ली, 21 मे: पीएम केअर्स फंडविरोधात संभ्रम पसरवल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कर्नाटकातील शिवमोघा जिल्ह्यातील सागर पोलिस स्टेशनमध्ये एका वकिलाच्या तक्रारीवरुन सोनिया गांधी यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या ट्विटर (INC) हॅण्डलवरुन पीएम केअर फंडाबाबत चुकीचं ट्वीट करण्यात आलं होतं. याबाबत कर्नाटकातील भाजपाचे कार्यकर्ता आणि वकील के.व्ही. प्रवीण यांनी सोनिया गांधी यांच्याविरुद्ध पोलिसां तक्रार दिली होती. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी 20 मे रोजी सोनिया गांधी यांच्याविरुद्ध भादंवि कलम 153 आणि 505 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

हेही वाचा.. शिवसेना माजी जिल्हा प्रमुखाची निर्घृण हत्या, खुलेआम गोळी झाडून मारेकरी पसार

दरम्यान, कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी पीएम-केअर्स फंडाची (PM Cares Fund) घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर्स फंडची स्थापना केली आहे. ही एक स्वतंत्र पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे. प्राईम मिनिस्टर सिटीझन असिस्टन्स अॅण्ड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन फंड (PM CARES Fund) असं या फंडचं पूर्ण नाव आहे. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी पीएम केअर्स फंडमध्ये जास्तीत जास्त योगदान करण्याचं आवाहन मोदींनी केलं.

विशेष म्हणजे कोरोना व्हायरसच्या रुग्णांकरता मदतनिधी म्हणून या फंडाची रचना करण्यात आली आहे. मात्र, अनेक वर्षांपासून सरकारी पीएम रिलिफ फंड तसंच पंतप्रधान आर्थिक सहाय्यता निधी कोष असताना नव्या फंडाची आवश्यकता का? असे अनेक आता उपस्थित करण्यात येत आहे. एकीकडे फंडासंदर्भात प्रश्न विचारले जात असताना, कॉर्पोरेट उद्योग विश्व तसेच बॉलीवूड क्षेत्रातून पीएम केअर्स फंडासाठी भरभरून योगदान मिळात आहे.

हेही वाचा... कोरोनामुळे मृत्यू झाला तर शवविच्छेदन करण्याची गरज आहे का? ICMR चा मोठा खुलासा

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने या फंडासाठी 25 कोटी रुपये देण्याची घोषणा केली. उद्योगपती गौतम अदानी यांनी या फंडाकरता 100 कोटी रुपये दिले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्रींकडून पीएम केअर्स फंडसाठी 25 हजार रुपयांची मदत केली आहे.

First published:
top videos