Home /News /national /

खासदाराकडून पार्टीतील महिलेवर बलात्कार; 3 महिन्यांनी गुन्हा दाखल, चिराग पासवान यांचंही FIRमध्ये नाव

खासदाराकडून पार्टीतील महिलेवर बलात्कार; 3 महिन्यांनी गुन्हा दाखल, चिराग पासवान यांचंही FIRमध्ये नाव

(file photo)

(file photo)

तीन महिन्यांपूर्वी एका तरुणीनं दिलेल्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी अखेर बिहारमधील समस्तीपूर येथील लोक जनशक्ती पार्टीचे (LJP) खासदार प्रिन्स राज (MP Prince Raj) यांच्याविरोधात कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

    नवी दिल्ली, 14 सप्टेंबर: तीन महिन्यांपूर्वी एका तरुणीनं दिलेल्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी अखेर बिहारमधील समस्तीपूर येथील लोक जनशक्ती पार्टीचे (LJP) खासदार प्रिन्स राज (MP Prince Raj) यांच्याविरोधात कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. FIRमध्ये एलजेपीचे नेते चिराग पासवान (FIR against LJP leader Chirag Paswan) यांचंही नावं आहे. संशयित आरोपी आणि चुलत भाऊ प्रिन्स राज पासवान यांच्याविरोधात कारवाईला उशीर केल्याचा आणि कट रचल्याचा आरोप चिराग पासवान यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दिल्ली न्यायालयानं आदेश दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी 9 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माहिती देताना, पीडितेची वकील सुदेश कुमारी जेठवा यांनी सांगितलं की, 'आम्ही मे महिन्यात दिल्ली पोलिसांत बलात्काराची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर जुलै महिन्यात दिल्ली न्यायालयात याबाबत अर्ज करण्यात आला होता. यानंतर दिल्ली न्यायालयानं खासदार प्रिन्स राज आणि त्यांचा चुलत भाऊ चिराग पासवान यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. हेही वाचा-आजारी मजुराला भेटायला गेला अन् परतलाच नाही; कामगारांनी मालकाचा केला वाईट शेवट विशेष म्हणजे, 10 फेब्रुवारी 2021 रोजी प्रिन्स राज यांनी फिर्यादी तरुणीच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी प्रिन्स राज म्हणाले होते की, 'एका महिलेनं माझ्याविरोधात काही आरोप केल्याची माहिती मला मिळाली आहे. त्यामुळे मी 10 फेब्रुवारी रोजीच तक्रार दाखल केली होती. तसेच पोलिसांसमोर सर्व पुरावे सादर केले होते.' हेही वाचा-...म्हणून पोलीस पती करायचा पत्नीचा छळ; विवाहितेनं गौरी आगमनाच्या दिवशीच दिला जीव नेमकं प्रकरण काय आहे? तक्रारीत म्हटल्यानुसार, पीडित तरुणी गेल्या वर्षी पहिल्यांदा पार्टी कार्यालयात प्रिन्स राज यांना भेटली होती. त्यानंतर दोघंही एकमेकांच्या संपर्कात होते. पुढे अनेकदा दोघं पार्टीच्या कामानिमित्त एकमेकांना भेटले होते. दरम्यान एका मिटींगमध्ये पीडितेनं पाणी पिण्यासाठी टेबलवरील बाटली घेतली. तेव्हा संशयित आरोपी प्रिन्स राज यांनी तुला दुसरं पाणी देतो, असं म्हणत ग्लासमध्ये वेगळं पाणी दिलं. हे पाणी प्यायल्यानंतर पीडित तरुणी बेशुद्ध पडली. त्यानंतर आरोपीनं तिच्यावर बलात्कार करत व्हिडीओ बनवल्याचा दावा पीडितेनं आपल्या तक्रारीत केला आहे. या घटनेनंतर पीडित तरुणीनं लोक जनशक्ती पार्टीतून राजीनामा दिला होता. त्यानंतरही संशयित आरोपी प्रिन्स राज पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी अनेकदा रात्री-अपरात्री घरी यायचा, असंही पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Mp, Rape

    पुढील बातम्या