मराठी बातम्या /बातम्या /देश /

ब्राह्मणांचा विरोध पडणार महागात; मुख्यमंत्र्यांकडून वडिलांविरोधात FIR दाखल

ब्राह्मणांचा विरोध पडणार महागात; मुख्यमंत्र्यांकडून वडिलांविरोधात FIR दाखल

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (CM Bhupesh Baghel) यांचे वडील नंदकुमार बघेल (Father Nandkumar Baghel) यांच्या विरोधात राजधानी रायपूरमध्ये एक FIR दाखल करण्यात आला आहे.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (CM Bhupesh Baghel) यांचे वडील नंदकुमार बघेल (Father Nandkumar Baghel) यांच्या विरोधात राजधानी रायपूरमध्ये एक FIR दाखल करण्यात आला आहे.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (CM Bhupesh Baghel) यांचे वडील नंदकुमार बघेल (Father Nandkumar Baghel) यांच्या विरोधात राजधानी रायपूरमध्ये एक FIR दाखल करण्यात आला आहे.

  • Published by:  News18 Desk

रायपूर, 06 सप्टेंबर: छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (CM Bhupesh Baghel) यांचे वडील नंदकुमार बघेल (Father Nandkumar Baghel) यांच्या विरोधात राजधानी रायपूरमध्ये एक FIR दाखल करण्यात आला आहे. अलीकडेच नंदकुमार बघेल यांनी ब्राह्मणांना 'उपरे' (बाहेरचे) म्हटलं होतं. बघेल यांच्या वक्तव्यावर ब्राह्मण समुदायानं आक्षेप घेत रायपूरच्या डीडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR Lodged) केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी म्हटलं की, कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ती कारवाई केली जाईल.

काही दिवसांपूर्वी एका आयोजित कार्यक्रमात नंदकुमार बघेल यांनी ब्राह्मण परदेशी असल्याचं म्हटलं होतं. त्यांना गंगेपासून वोल्गाला पाठवेल. ब्राह्मणांनी एकतर सुधारणा करावी किंवा वोल्गाला जाण्यासाठी तयार रहावं. डीडी नगर पोलीस ठाण्याच्या प्रभारी योगिता खापरडे यांनी सांगितलं की, नंदकुमार बघेल यांच्या वक्तव्यावर ब्राह्मण समाजानं आक्षेप नोंदवला आहे. नंदकुमार बघेल यांच्यावर समाजात द्वेष निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला असून याबाबत पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार डीडी नगर पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 505 आणि 153 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा-पांचजन्य मासिकातल्या लेखावर RSS चं स्पष्टीकरण, म्हणाले...

कायद्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही

वडिलांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचं वक्तव्यही समोर आलं आहे. ते म्हणाले की, 'एक मुलगा म्हणून मी माझ्या वडिलांचा आदर करतो. पण एक मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कोणत्याही चुकाकडं दुर्लक्ष करता येणार नाही, ज्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था बिघडेल.'

हेही वाचा-Belgaum Election result: पहिल्या विजयाची नोंद, कोण आघाडीवर?

यावेळी बघेल म्हणाले की, 'आमच्या सरकारमध्ये कोणीही कायद्याच्या वर नाही, मग ते मुख्यमंत्र्यांचे वडील असले तरीही. बघेल पुढे म्हणाले की, 'वडिलांनी एका विशिष्ट वर्गाविरोधात केलेल्या वक्तव्याच्या माहिती मिळाली आहे. त्यांच्या वक्तव्यानं मन दुखावलं आहे. आमचं सरकार प्रत्येकाकडे एकाच दृष्टिकोनातून पाहते. सुरुवातीपासूनच माझे वडिलांशी वैचारिक मतभेद आहेत, हे सर्वांना माहित आहे. आमचे राजकीय विचार देखील पूर्णपणे भिन्न आहेत. या संदर्भात पोलिसांकडून कायदेशीर कारवाई सुनिश्चित केली जाईल.'

First published: