मराठी बातम्या /बातम्या /देश /दिल्लीत संजय राऊतांविरोधातला FIR रद्द होणार, शिवसेनेच्या खासदारांचा दावा

दिल्लीत संजय राऊतांविरोधातला FIR रद्द होणार, शिवसेनेच्या खासदारांचा दावा

 शिवसेना खासदाराच्या शिष्टमंडळाने आज दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना (Police Commissioner Rakesh Asthana) यांची भेट घेतली.

शिवसेना खासदाराच्या शिष्टमंडळाने आज दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना (Police Commissioner Rakesh Asthana) यांची भेट घेतली.

शिवसेना खासदाराच्या शिष्टमंडळाने आज दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना (Police Commissioner Rakesh Asthana) यांची भेट घेतली.

नवी दिल्ली, 14 डिसेंबर : शिवसेनेचे खासदार आणि संपादक संजय राऊत (sanjay raut) यांच्याविरोधात दिल्लीतील मंडावली पोलीस स्टेशन (Mandawali Police Station in Delhi) अंतर्गत दाखल करण्यात आलेला एफआयआर परत घ्यावा या मागणीसाठी शिवसेना खासदाराच्या शिष्टमंडळाने आज दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना (Police Commissioner Rakesh Asthana) यांची भेट घेतली. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करूनच काही निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन राकेश अस्थाना यांनी दिलेले आहे असा दावा शिवसेनेच्या खासदारांनी केला आहे.

दिल्लीतील जयसिंग मार्गावर असलेल्या पोलीस मुख्यालयात शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई यांनी पोलीस आयुक्त राकेश आस्थाना यांची भेट घेतली.

'ज्या पद्धतीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्यांनी एफआयआर दाखल केली आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे या संदर्भात भेटीत निवेदन दिले. राजकीय सुडाने तक्रार करण्यात आली आहे. ही एफआयआर लागू कशी होत नाही, हे संपूर्ण आधरासहित मांडले. पोलीस आयुक्त आयुक्त राकेश अस्थाना यांनी कोणताही पूर्वग्रहाने कारवाई करणार नसल्याचे आश्वासन दिले असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

मुलाने बापाचा खून केला अन् आईवर केले चाकूने वार, कल्याणमधील घटना

'शिवसेनेला बदनाम करण्यासाठी हा कट रचला जात आहे, महत्त्वाचे म्हणजे संजय राऊत यांच्या माध्यमातून प्रकारची वर्तणूक कोणीही कदापिही शक्य नाही, असेही त्यांनी सांगितलं.

'कॅप्टन झाली म्हणून डोक्यावर बसू नको', विकास- मीनलमध्ये जोराचा राडा

यावेळी शिष्टमंडळात असलेले शिवसेना नेते अनिल देसाई म्हणाले की, 'या भेटीमध्ये पोलीस आयुक्तांना  509, 500 कलमातील अर्थ सांगितला. हे दोन्ही कलम लागू होत नसल्याचे त्यांनी सांगितलं. महिलेचा कोणताही अवमान केलेला नाही, अशी ही बाजू अनिल देसाई यांनी  मांडली. संजय  राऊत यांची समाजात प्रतिष्ठा आहे. ते संपादक आहे. त्यांच्याकडून कोणत्याही घटकाकडून गैरवर्तन झालेली नाही, होणार नाही', अशी ग्वाही त्यांना दिली.

First published: