Home /News /national /

100 हून अधिक एनकाऊंटर केलेल्या IPS अधिकाऱ्याविरोधात FIR, महिलेने लावले गंभीर आरोप

100 हून अधिक एनकाऊंटर केलेल्या IPS अधिकाऱ्याविरोधात FIR, महिलेने लावले गंभीर आरोप

आयपीएस अजय पाल शर्मा यांच्याविरोधात फसवणूक, गुन्हेगारी, कटाचे पुरावे मिटविल्याप्रकरणी एफआयआर नोंदविण्यात आला आहे

    लखनऊ, 9 मार्च : भारतील पोलीस सेवा (IPS) अधिकारी अजय पाल शर्मा (IPS Ajay Pal Sharma) यांच्या विरोधात लखनऊच्या हजरतगंज ठाण्यात केस दाखल करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या गृहविभागाच्या आदेशानुसार आयपीएस अधिकाऱ्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नोएडाचे माजी एसएसपी वैभव कृष्णा यांनीदेखील अजय पाल शर्मा यांच्यावर आरोप लावले आहेत. अजय पाल शर्मा यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम (Indian Penal Code) 409, 201 आणि 120 बी अंतर्गत केस दाखल करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात दीप्ती शर्मा नावाच्या महिलेने केस दाखल केली आहे. महिलेने स्वत:ला अजय पाल शर्मा यांची पत्नी असल्याचे सांगितले आहे. महिलेचा दावा आहे की, त्यांनी 2016 मध्ये अजय पाल शर्मा यांच्यांशी लग्न केले होते. या लग्नाचे रजिस्टेशन गाजियाबादमध्ये झाले होते. त्यावेळी अजय पाल शर्मा एसपी (SP) सिटी गाजियाबाद येथे तैनात होते. त्यावेळी अजय शर्मा यांच्या अनैतिक संबंध असल्याने दोघांमध्ये दूरावा आला होता. रामपूर सिव्हिल ठाणे येथून अजय पाल शर्मा यांच्या सांगण्यानुसार काही लोक गाजियाबाद स्थित त्यांच्या घरी आले होते आणि लॅपटॉपसह अनेक महत्त्वाचे पुरावे घेऊन गेले. याबाबत महिलेने डीआयजी रेंज मेरठ आणि अन्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मार्च 2019 मध्ये अजय पाल शर्मा यांच्याशी बोलणं झालं होतं, त्यानंतर त्रास दिला जात असल्याचा दावा महिलेने केला आहे. हे वाचा - खूशखबर! 9 महिन्यानंतर स्वस्त झालं पेट्रोल, असे आहेत आजचे दर महिलेने आरोप केला आहे अजय पाल शर्मा यांच्या इशाऱ्यावरुन त्यांच्याविरोधात फसवणुकाची केस दाखल झाली आहे. तिच्याकडून सर्व पूरावे घेण्यात आले, शिवाय तिला तुरुंगातही पाठविण्यात आले होते, असा दावा महिलेने केला आहे. या महिलेने तुरुंगात राहून अजय पाल यांच्याविरोधात एफआयआर केला आहे. काय आहेत आयपीएसवर आरोप विशेष सचिव गृह अनिल कुमार सिंह यांच्या आदेशानुसार हजरतगंज पोलिसांनी आयपीएस अजय पाल शर्मा यांच्याविरोधात फसवणूक, गुन्हेगारी, कटाचे पुरावे मिटविल्याप्रकरणी एफआयआर नोंदविण्यात आला आहे. महिलेने दिलेल्या अहवालात इतर पोलिसांवरही आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. माहितीनुसार, आयपीएस वैभव कृष्णा यांनी नोएडामधून काढून टाकलेल्या पाच अधिकाऱ्यांमध्ये अजय पाल शर्मा यांचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात एसआयटी चौकशीही करण्यात आली होती, त्यात अजय पाल यांच्याविरूद्ध पुरावेही सापडले आहेत. विशेष म्हणजे अजय पालवर 100 हून अधिक एनकाऊंटर केल्याची नोंद आहे. हे वाचा - ॲक्सिस बँकेचा उलटा कारभार, शेतकऱ्याविरुद्ध काढलं कोलकाता कोर्टाचं वॉरंट
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Encounter, IPS CASE, Women

    पुढील बातम्या