गौतम गंभीरविरोधात FIR दाखल; केली मोठी चूक

गौतम गंभीरविरोधात FIR दाखल करण्ययात आली आहे.

गौतम गंभीरविरोधात FIR दाखल करण्ययात आली आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 27 एप्रिल : माजी क्रिकेटर गौतम गंभीर आणि भाजपचे पूर्व दिल्लीतील उमेदवार गौतम गंभीर यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. कारण, त्यांच्याविरोधात आता FIR दाखल करण्यात आला आहे. विना परवानगी रॅली काढल्यानं रिटर्निंग ऑफिसरच्या तक्रारीवरून ही एफआयआर दाखल केली आहे. आचंरसंहितेचं पालन न केल्याची तक्रार गंभीर विरोधात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी एफआरआर दाखल केली आहे. यापूर्वी आम आदमी पक्षानं देखील गौतम गंभीरकडे दोन मतदान ओळखपत्र असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे उमेदवारी मिळाल्यापासून गौतम गंभीर सतत चर्चेत राहिले आहेत. अमेरिकेच्या 200 कंपन्या चीनला देणार धक्का; निवडणुकीनंतर होणार उलथापालथ? काय आहे गौतम गंभीरवर आरोप आप उमेदवार आतिशी यांच्यानुसार गौतम गंभीर यांच्याकडे दोन मतदान ओळखपत्र आहेत. एक मतदान ओळखपत्र हे राजेंद्र नगरमधील आहे. तर, दुसरं मतदान ओळखपत्र हे करोल बागमधील आहे. याप्रमाणे दोन मतदान ओळखपत्र ठेवणं हा फौजदारी गुन्हा आहे. अशा प्रकारे जर एका व्यक्तिकडे दोन मतदार ओळखपत्र असल्यास निवडणूक आयोग सदर व्यक्तिला नोटीस पाठवू शकते. शिवाय, एका ठिकाणाहून सदर व्यक्तिला त्याचं नाव कमी करण्यास सांगितलं जातं. तसंच दिलेल्या कालावधीमध्ये सदर व्यक्तिनं नाव न हटवल्यास त्याच्याविरोधात पोलिस कारवाई करण्यात येते. 8 राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता; मुंबईसह महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी यापूर्वी देखील लागला होता आरोप दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर गौतम गंभीरवर त्यानं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर देखील काही प्रश्न उपस्थित केले गेले होते. त्यानंतर रिटर्निंग ऑफिसरनं गौतम गंभीरला उत्तर देण्यासाठी देखील बोलावलं होतं. सध्या गौतम गंभीर जोरात प्रचार करत आहे. यावेळी त्यानं जिंकून येणार असा विश्वास देखील व्यक्त केला आहे. दिल्लीतील काही रंगतदार लढतींपैकी पूर्व दिल्लीची लढत आहे. VIDEO : पार्थ पवारांसाठी नवनीत राणांच्या रॅलीत राडा, कार्यकर्त्यांनी रॅली अर्ध्यावर सोडली
    First published: