FinCEN Files : भारतात 2 लाख कोटींचा भ्रष्टाचार, अनेक मोठी नावं आणि बँकांचा समावेश

FinCEN Files : भारतात 2 लाख कोटींचा भ्रष्टाचार, अनेक मोठी नावं आणि बँकांचा समावेश

या यादीत देशातील अनेक कंपन्या आणि व्यक्तींचा समावेश आहे. ज्यांची चौकशी सीबीआय, ईडी आणि डीआरआय अशा यंत्रणा करत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : देशात आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा दावा अमेरिकेच्या अर्थखात्याच्या फायनान्शियल क्राइम्स इंफोर्समेंट नेटवर्क (FinCEN Files)ने केला आहे. घोटाळे, करचोरीतून देशात तब्बल  दोन लाख कोटींच्या भ्रष्टाचाराचा झाल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.

इंडियन एक्स्प्रेस आणि दैनिक लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार,  अमेरिकेच्या अर्थखात्याच्या फायनान्शियल क्राइम्स इंफोर्समेंट नेटवर्क (FinCEN Files) कडे देशातील भ्रष्ट अधिकारी, बँकांमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांची यादी असल्याचा दावा केला आहे. जर ही यादी जाहीर झाली तर भारताच्या राजकारणात मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे.

फिनसेनच्या कागदपत्रांमध्ये वादग्रस्त ऑगस्टा वेस्टलँड, एअरसेल मॅक्सिस, 2 जी घोटाळा आणि रोल्स रॉयस लाचखोरी प्रकरणासह करचोरीच्या अनेक प्रकरणांमध्ये गुंतलेल्या कंपन्या आणि व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे.

तर दुसरीकडे इंटरनॅशनल कंसोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट (आयसीआयजे) यांच्या मदतीने नावांचा उलगडा सुद्धा होऊ लागला आहे. फिनसेन फाइल्समध्ये ज्या नावांची यादी तयार करण्यात आली आहे, त्याची माहिती ही 88 देशांमधील 109 पेक्षा जास्त वृत्तसंस्थेना मिळाली आहे. त्यामुळे जर ही नावे जाहीर झाली तर देशात एकच खळबळ उडेल.

तर  इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, फिनसेन फाइल्समधून असा उलगडा झाला आहे की, यात दोन हजार गोपनीय कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची अवैधरीत्या देवाणघेवाण करण्यात आली आहे. यात अनेक भारतीयांचा समावेश आहे.  एव्हाना हा व्यवहार ज्या बँकांच्या मदतीने झाला आहे. त्यांचीही नावे यात आहे.

भारतात सुमारे दोन लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा या फाइल्समधून करण्यात आला आहे. त्यामुळे भारतातील विविध तपास यंत्रणा चौकशी करत असलेल्या वेगवेगळ्य घोटाळेबाज व्यक्तींच्या नावांचा या कागदपत्रांमधून शोध घेण्याचा प्रयत्न झाला आहे.

त्याचबरोबर या यादीत देशातील अनेक कंपन्या आणि व्यक्तींचा समावेश आहे. ज्यांची चौकशी सीबीआय, ईडी आणि डीआरआय अशा यंत्रणा करत आहेत.

फिनसेन फाइल्समध्ये  आयपीएल टीमची एक स्पॉन्सर कंपनी,  ग्लोबल डायमंड कंपनीचा भारतात जन्मलेला एक सदस्य, हेल्थकेअर आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टरमधील मोठ्या कंपनी, तुरुंगात असलेला तस्कर, आलिशान कारचा डिलर आणि भारतातील अंडरवर्ल्ड डॉनच्या एका फायनान्सरचा समावेश आहे. एवढंच नाहीतर अनेक इतर कंपन्यांचाही  समावेश आहे.

1999 ते 2017 या काळात भारतात झालेले घोटाळे आणि गैरव्यवहारांचा यात समावेस आहे. भारतातील बँकांच्या 3 हजार 201 खात्यांमधून 1.53 अब्ज डॉलर सुमारे 112 कोटी रुपयांची देवाणघेणाव झाली असून यातील अनेक नावंही भारतातील आहेत. त्याचे पत्तेही भारतातील असून काही परदेशीतील पत्यांचाही समावेश आहे. एकूण 44 बँकांचा अवैधरित्या वापर झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये देशातील पंजाब नॅशनल बँक, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, कॅनरा बँक, इंडसइंड बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकांचा समावेश आहे.

Published by: sachin Salve
First published: September 21, 2020, 11:40 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading