'बेलआऊट पॅकेज'ला रिलायन्स जिओचा विरोध; रविशंकर यांना लिहले पत्र!

'बेलआऊट पॅकेज'ला रिलायन्स जिओचा विरोध; रविशंकर यांना लिहले पत्र!

जिओने यासंदर्भातील एक पत्र दूरसंचारमंत्री रविशंकर यांना लिहले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर काही दूरसंचार कंपन्यांना बेलआऊट पॅकेज देण्याचा विचार सरकार करत आहे. या निर्णयाला रिलायन्स जिओ यांनी तीव्र विरोध केला आहे. जिओने यासंदर्भातील एक पत्र दूरसंचारमंत्री रविशंकर यांना लिहले आहे.

अशा प्रकारचे बेलआऊट पॅकेज दिल्यास एक चुकीची प्रथा सुरु होईल. तसेच हा निर्णय म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने अवमान ठरेल असे जिओने पत्रात म्हटले आहे. या पत्रात जिओने कोणत्याही कंपनीचा उल्लेख केला नाही. पण त्यांचा इशारा हा भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांकडे आहे. दूरसंचार कंपन्यांनी याआधी मिळवलेल्या नफ्यातून सुधारीत नफा सरकारला द्यावा लागले, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने काही दिवासांपूर्वी दिला होता. या निर्णयानुसार दूरसंचार कंपन्यांना सरकारला 1.42 लाख कोटी रुपये द्यावा लागणार आहेत. ही रक्कम प्रामुख्याने भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांनाच द्यावी लागणार आहे.

जिओकडून हे पत्र रविशंकर प्रसाद यांना देण्याआधी दूरसंचार कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सेल्युलर ऑफरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (COIA)ने जिओच्या भूमिकेवर टीका केली होती. जिओच्या मते COIA विनाकारण दूरसंचार उद्योगावर संकट आल्याचे सांगत आहे. ही संघटना सरकारला धमकावत असून पक्षपात करण्यासाठी दबाव टाकत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. अशा प्रकारचे बेलआऊट पॅकेज देणे म्हणजे देशातील सर्व सामान्य करदात्यांच्या पैशांवर दूरसंचार कंपन्या पोसल्यासारखे आहे.

दूरसंचार कंपन्यांना बेलआऊट पॅकेज देण्यासाठी COIA दोन वेळा दूरसंचारमंत्री रविशंकर यांना पत्र लिहले आहे. त्यामुळेच जिओने यासंदर्भात अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. न्यायालयाने सुनावणी दरम्यान कंपन्यांचे सर्व युक्तीवाद फेटाळून लावले होते. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाऊ नये, असे देखील म्हटल्याचा उल्लेख जिओने पत्रात केले आहे.

VIDEO : '...त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करेल'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2019 02:42 PM IST

ताज्या बातम्या