'जेट'नंतर ही कंपनी अडचणीत; पगार देण्यास असमर्थ!

'जेट'नंतर ही कंपनी अडचणीत; पगार देण्यास असमर्थ!

जेट एअरवेज आणि किंगफिशर एअरलाइन्सनंतर आता आणखी एक विमानसेवा देणारी कंपनी अडचणीत सापडली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 एप्रिल: जेट एअरवेज आणि किंगफिशर एअरलाइन्सनंतर आता आणखी एक विमानसेवा देणारी कंपनी अडचणीत सापडली आहे. गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत सापडलेल्या या कंपनीने 25 एप्रिल रोजी नोटीस पाठवून सर्व कर्मचाऱ्यांनी एप्रिल महिन्याचा पगार मिळणार नसल्याचे सांगितले आहे.

पवन हंस लिमिटेड या कंपनीने एप्रिल महिन्याचा पगार देणे शक्य नसल्याचे कर्मचाऱ्यांना कळवले आहे. कंपनी सध्या आर्थिक अडचणीत आहे आणि भविष्यात देखील फार चांगली परिस्थिती येईल असे वाटत नाही, असे कंपनीने कर्मचाऱ्यांना कळवले आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात पवन हंसची आर्थिक परिस्थिती फारच बिघडली असून तिचा तोटा 89 कोटींवर पोहोचला आहे.

230 कोटी थकवले

कंपनीचे उत्पन्न दिवसेंदिवस कमी होत चालले आहे तर खर्च वाढत चालला आहे. विशेषत: कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या खर्चावर अधिक खर्च होत आहे. परिस्थिती आणखी बिघडत चालली आहे कारण पवन हंसच्या अनेक जुन्या ग्राहकांनी पैसेच दिले नाहीत. ही रक्कम 230 कोटींच्या घरात आहे. अशा आर्थिक अचडणीमुळे कंपनीने कर्मचाऱ्यांना पगार होणार नसल्याचे सांगितले आहे. जोपर्यंत ग्राहकांकडून 60 टक्के देणी वसूल होत नाहीत तोपर्यंत पगार दिला जाणार नाही असे देखील कंपनीने स्पष्ट केले आहे. ग्राहकांनी 60 टक्के देणी दिली तर कंपनीकडे 130 कोटी जमा होतील.

कर्मचारी नाराज, म्हणाले...

कंपनीने पगार देण्यास असमर्थता व्यक्त केल्याने पवन हंस कर्मचारी संघाने नाराजी व्यक्त केली आहे. कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याची वेळ आली होती तेव्हा पगार थांबवला केल्या ही चुकीची गोष्ट असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. याविरुद्ध सर्व कर्मचारी हातावर काळी रिबिन बांधून काम करणार आहेत. तसेच या प्रकरणी सीबीआय आणि कॅग कडे तक्रार करणार असल्याचे संघाने म्हटले आहे.

VIDEO : अमेठीत लागली आग, स्मृती इराणी मदतीला गेल्या धावत

First published: April 28, 2019, 10:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading