मोदी सरकारचा मोठा निर्णय; IT विभागाच्या डागळलेल्या 12 अधिकाऱ्यांना ‘नारळ’

मोदी सरकारचा मोठा निर्णय; IT विभागाच्या डागळलेल्या 12 अधिकाऱ्यांना ‘नारळ’

Income Tax Department : आयकर विभागाच्या 12 बड्या अधिकाऱ्यांना सक्तीनं निवृत्त करण्यात आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 जून : अर्थमंत्रीपदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर निर्मला सीतारामन यांनी आयकर विभागाच्या 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती दिली आहे. या 12 अधिकाऱ्यांना नियम 56च्या अंतर्गत निवृत्त करण्यात आलं आहे. निवृत्त करण्यात आलेल्या अनेक अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार, बेहिशेबी मालमत्तेचे आरोप आहेत. निवृत्त केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये आयुक्त, मुख्य आयुक्त यांचा समावेश आहे. ही कारवाई म्हणजे आयकर विभागातील शक्तिशाली अधिकाऱ्यांवर देशात पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई झाल्याचे मानले जात आहे. कारवाई झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये आयकर विभागातील मुख्य आयुक्त दर्जांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. निवृत्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये 1985च्या आयआरएस तुकडीचे अधिकारी अशोक अग्रवाल यांचा समावेश आहे. अशोक अग्रवाल ईडीमध्ये कार्यरत होते. त्यांच्याविरुद्ध अनेक खटले दाखल आहेत.

कोण आहेत अधिकारी

या 12 अधिकाऱ्यांमध्ये अशोक अग्रवाल (IRS 1985), एस. के. श्रीवास्तव (IRS1989), होमी राजवंश (IRS 1985), बीबी राजेंद्र प्रसाद, अजॉय कुमार सिंह, बी. अरुलप्पा, आलोक कुमार मित्रा, चांदर सेन भारती, अंडासु रवींद्र, विवेक बत्रा, स्वेताभ सुमन आणि राम कुमार भार्गव यांचा समावेश आहे.

नाशिकमध्ये मान्सूनपूर्व पावसाचे 3 बळी

भ्रष्टाचार मुक्त भारत

मोदी सरकारनं भ्रष्टाचारमुक्त भारताचा नारा दिला आहे. त्यातंर्गत ही कारवाई केल्याचं मानलं जात आहे. दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रदानपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी खांदेपालट करत निर्मला सीतारामन यांच्यावर अर्थमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. अर्थखात्याचा भार हाती घेताच निर्मला सीतारामन यांनी काही कठोर निर्णय घ्यायला सुरूवात केली होती. संरक्षण मंत्री असताना देखील निर्मला सीतारामन यांची कारकीर्द गाजली. आता अर्थमंंत्रीपदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर देखील निर्मला सीतारामन यांनी घेतलेल्या पहिल्या निर्णयावरून चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

VIDEO : लंडनमध्ये मॅच पाहायला पोहोचला विजय मल्ल्या, लोकांनी केलं असं 'स्वागत'

First published: June 11, 2019, 10:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading