अर्थमंत्री म्हणाल्या, 'मी कांदा खात नाही, त्यामुळे...'; सोशल मीडियावर व्हायरल होतोय Video

अर्थमंत्री म्हणाल्या, 'मी कांदा खात नाही, त्यामुळे...'; सोशल मीडियावर व्हायरल होतोय Video

सोशल मीडियावर #OnionPrice हा हॅशटॅग ट्रेंड

  • Share this:

नवी दिल्ली, 05 डिसेंबर: कांद्याच्या वाढणाऱ्या दरामुळे देशातील नागरिकांच्या डोळ्यातून पाणी येत असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman)यांनी संसदेत केलेले वक्तव्य सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. अर्थमंत्री सीतारमण यांनी चर्चे दरम्यान कांद्याच्या वाढणाऱ्या किमतीमुळे मला वैयक्तीक पातळीवर काही फार पडत नाही. कारण माझ्या कुटुंबात कांदा आणि लसुण सारख्या गोष्टी फार आवडणी खाल्या जात नाहीत. अर्थमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर #OnionPrice हा हॅशटॅग ट्रेंड मध्ये आला आहे.

लोकसभेत बुधवारी बोलताना सीतारमण म्हणाल्या, मी जास्त कांदा-लसूण खात नाही. त्यामुळे काळजी करू नका. मी अशा कुटुंबातून आली आहे जेथे कांद्याचा जास्त वापर होत नाही. आता अर्थमंत्र्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यासोबत #OnionPrice हा हॅशटॅग देखील ट्रेंडमध्ये आला आहे. अनेक युझर्सनी सीतारमण यांच्या वक्तव्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर तहसीन पुनावाला यांनी विरोधी पक्षाला कांद्याच्या किमतीवरून रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे. पुनावाला यांनी अर्थमंत्र्यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे. अर्थमंत्री कांदा खात नसल्याने त्यांना किमती वाढल्याने फार फरक पडत नाही. ही गोष्ट अमान्य असल्याचे पुनावाला यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एनपीए आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात प्रश्न विचारला. सरकार इजिप्तमधून कांदा आयात करणार आहे. ही निश्चित चांगली बाब आहे. पण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत. देशात कांद्याचे उत्पादन कमी का होत आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला.

सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण उभ्या झाल्या तेव्हाच काही सदस्यांनी तुम्ही कांदा खाता का? असा सवाल विचारला. त्याला उत्तर देताना सीतारमण यांनी वरील उत्तर दिले.

Published by: Akshay Shitole
First published: December 5, 2019, 1:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading