LIVE NOW

LIVE Union Budget 2019 : मोदींचा 'मास्टरस्ट्रोक', घोषणांचा पाऊस, सवलतींचा वर्षाव!

निवडणुका जवळ असल्याने कठोर निर्णय घेऊन सरकार कुठल्याही घटकांना नाराज करण्याची शक्यता नाही.

Lokmat.news18.com | February 1, 2019, 1:12 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated February 1, 2019
auto-refresh

Highlights

12:46 pm (IST)

12:46 pm (IST)

अर्थसंकल्प 2019 - आयकराच्या घोषणेमुळे मध्यमवर्गाला मोठा दिलासा


Load More
नवी दिल्ली 01 फेब्रुवारी :  केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांनी सरकारचा सहावा हंगामी अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला.  लोकसभेच्या निवडणुका चार महिन्यांवर आल्या असल्यामुळे या अर्थसंकल्पात अपेक्षेप्रमाणे सरकारने घोषणांचा पाऊस पाडला. सगळ्यात मोठा निर्णय म्हणजे आकराची मर्यादा अडीच लाखांवरून 5 लाखांवर नेण्यात आली आहे. यामुळे 3 कोटी लोकांना फायदा होणार आहे. त्याचबरोबर छोट्या शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान मानधन योजनेची घोषणा सरकारने केली आहे. या योजनेनुसार अशा शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. डिसेंबर 2018 पासून ही मदत मिळणार असून पहिला 2 हजारांचा हफ्ता येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. निवडणुकीच्या आधी सरकार ही रक्कम जमा करण्याची शक्यता आहे. कामगारांच्या मूळवेतनात वाढ आणि त्यांना पेन्शन योजना सरकारने जाहीर केली आहे. हा पूर्ण नाही तर हंगामी अर्थसंकल्प असणार आहे. तोंडावर आलेल्या लोकसभेच्या निवडणुका आणि सगळ्यांच्या वाढलेल्या अपेक्षा यामुळे अर्थसंकल्प सादर करताना सरकारला कसरत करावी लागली. गोवंशाचं संवर्धन करण्यासाठी एका आयोगाची स्थापना करण्याचा निर्णयही सरकारने जाहीर केलाय. शेतकरी, मध्यमवर्ग आणि करदात्यांना या अर्थसंकल्पात खूष करण्याचा सरकारचा प्रयत्न होता. सरकारने गेल्या साडेचार वर्षात  आश्चर्याचे धक्के देत अनेक निर्णय जाहीर केले. नोटबंदी हा त्यातलाच एक महत्त्वाचा निर्णय. त्यामुळे या शेवटच्या अर्थसंकल्पातही अशाच घोषणा होण्याची शक्यता होती आणि त्याच अपेक्षांची पूर्तता कर सरकारने सवलतींचा वर्षाव केला आहे.
corona virus btn
corona virus btn
Loading