ओला, उबरमुळे वाहनउद्योग संकटात; अर्थमंत्र्यांनी नव्या पिढीवर फोडलं खापर

ओला, उबरमुळे वाहनउद्योग संकटात; अर्थमंत्र्यांनी नव्या पिढीवर फोडलं खापर

देशाच्या अर्थमंत्र्यांनी मंदीचं खापर ओला, उबर सेवांवर फोडलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर: भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्र गेल्या 20 वर्षांत पहिल्यांदाच मंदीच्या गर्तेत सापडण्याच्या बेतात आहे. या क्षेत्रात हजारो नोकऱ्यांवर गदा येणार आहे. देशाच्या अर्थमंत्र्यांनी या मंदीचं खापर फोडलं आहे ओला, उबर सेवांवर. आजची नवी पिढी नवीन कार घेण्यासाठी उत्सुक नाही. त्यांना ओला, उबरसारख्या सेवांची सवय झाली आहे. त्यामुळे वाहन उद्योगावर मंदीचं सावट आहे, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या.

नवीन गाड्यांची निर्मिती होणं बंद झालं आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी काही काळासाठी कारखाने बंद ठेवले आहेत. मंदीची झळ बसल्याने वाहन उद्योग संकटात आहे. त्याला जबाबदार नव्या पिढीची बदललेली सवय असल्याचं निर्मला सीतारामन यांचं म्हणणं आहे.

भारतीय वाहन उद्योगाला सलग दहाव्या महिन्यात तोटा सहन करावा लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत मागणी 30 टक्क्यांनी घटली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये 2,82,809 एवढी वाहनं विकली गेली. तोच आकडा या ऑगस्टमध्ये 1,95,558 वर आला आहे. ही मागणी कमी होण्यासाठी नवी पिढी जबाबदार असल्याचं अर्थमंत्र्यांचं मत आहे.

VIDEO : वंचितकडून जातीयवादी पक्षाला मदत, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

First published: September 10, 2019, 10:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading