नवी दिल्ली, 26 जानेवारी : कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढली आहे. पोलिसांसोबत दोन हात करत अखेर ही रॅली दिल्लीच्या लालकिल्यावर धडकली आहे.
टिकरी बॉर्डरपासून निघालेल्या शेतकऱ्यांची विराट ट्रॅक्टर रॅली अखेर दिल्लीच्या तख्ताजवळ पोहोचली आहे. दिल्ली पोलिसांनी ठिकठिकाणी कडेकोड बंदोबस्त लावून सुद्धा शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन लालकिल्ल्यावर धडकले आहे. लाल किल्ल्यावर पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांनी जोरदार जल्लोष केला आहे.
त्याआधी काही ठिकाणी शेतकरी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे पाहण्यास मिळाले. दिल्ली पोलिसांकडून ठिकठिकाणी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ट्रॅक्टर जावू नये म्हणून दिल्ली शहराच्या बसेस आडव्या लावण्यात आल्या आहेत.
#WATCH Protestors enter Red Fort in Delhi, wave flags from the ramparts of the fort pic.twitter.com/4dgvG1iHZo
— ANI (@ANI) January 26, 2021
नांगलोई, नजफगड, बहादुरगड येथून परत मागे जात शेतकऱ्यांची रॅली टिकरी बार्डरवर पोहोचली. त्यावेळी शेतकऱ्यांनी नांगलोई इथं बॅरिकेटस तोडून टाकले आहे. पोलिसांनीही शेतकऱ्यांच्या रॅलीवर अश्रू धुरांचा मारा केला आहे. त्यामुळे संतापलेल्या जमावाने पोलिसांवर चाल केली आहे. लाठ्या-काठ्या घेऊन पोलिसांच्या दिशेनं धाव घेतली. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पण तरीही शेतकरी मागे हटण्यास तयार नाही. मोठ्या संख्येनं ट्रॅक्टर लाल किल्ल्याकडे पोहोचत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.