नवी दिल्ली, 08 ऑगस्ट : अखेर मुंबईतील लोकल सेवा ((Mumbai Local starting from 15th August)) मुंबईकरांसाठी सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 'उशिरा का होईना सर्वसामान्य जनतेच्या समस्या आणि विरोधी पक्ष हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (cm uddhav thackery) कळाला आहे. आम्ही विरोधासाठी विरोध करत नव्हतो' असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ ऑगस्टपासून लोकल सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या निर्णयाचं चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केलं आहे.
'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषणेचं मी स्वागत करतो. उशिरा का होईना सर्वसामान्य जनतेच्या समस्या आणि विरोधी पक्ष हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कळाला आहे. आम्ही विरोधासाठी विरोध करत नव्हतो. कोरोनाची तिसरी लाट, डेल्टा व्हेरियंट वगैरे वगैरे येणार असं ऐकून लोकं आता वेडी होतील. दुसऱ्या बाजूने भूकबळी होईल. समाजात असा मोठा वर्ग आहे, ज्यांची सेव्हिंग नाही. त्यामुळे दुकानं सुरू करा, लोकल सुरू करा आणि मंदिरं सुरू करा अशी मागणी केली जात होती' असंही पाटील म्हणाले.
IND vs ENG : 'हे तर लाजिरवाणं', पहिल्या टेस्टनंतर विराट कोहली भडकला
'जर दोन लशीचे डोस घेतले असतील, मास्क वापरणे सर्व नियम पाळत असेल तर लोकल सेवा सुरू करायला पाहिजे अशी आमची आणि लोकांचीही मागणी होती, अखेर उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे, त्यांची अंमलबजावणी सुद्धा केली पाहिजे, असंही पाटील म्हणाले.
'सर्वसामान्य माणसं, हायकोर्टाचा सरकारवर दबाव होता. छत्रपती शिवाजी महाराज यांना लोकांच्या मनातील कळायचे. प्रत्येकवेळी आंदोलनं करायची, हायकोर्टाने फटकारून काढायचे हे काही बरोबर नाही, दूरदृष्टी असलेल्या उद्धव ठाकरे यांनी हे ओळखलं पाहिजे, असंही पाटील म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचा भाजपवर निशाणा
दरम्यान, जनतेशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर अप्रत्यक्षरीत्या निशाणा साधला. 'हे उघडा ते उघडा, असं काही जण म्हणत आहे. महाराष्ट्रातील काही घटक लोकांची माथी भडकावत आहे. पण महाराष्ट्रातील जनतेनं अशा उचापात्या करणाऱ्या लोकांना बळी पडू नये, महाराष्ट्र मॉडेल आणि मुंबई मॉडेलचं कौतुक होत आहे. हे कौतुक आमचं नाहीतर जनतेचं आहे, असं म्हणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.
सॉफ्ट स्किल्स म्हणजे नक्की काय? टॉप सॉफ्ट स्किल्स जे तुमच्यामध्ये असणं आवश्यक
तसंच, दुकानं खुली ठेवावी अशी मागणी होत आहे. मी तर म्हणतो २४ तास दुकानं उघडी ठेवूया, पण कामाच्या वेळेत बदल करावा लागणार आहे. जिथे गर्दी वाढली तिथे रुग्ण वाढले आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, मंदिर खुली करण्यासाठी ८ दिवस लागणार आहे. कोरोना गेला आहे, तर दुकानं उघडा अशी मागणी करत आहे. आता लोकांचा संयम सुटत चालला आहे. पण, संयम ठेवावा लागणार आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.