Home /News /national /

अखेर शरद पवारांनी घेतला निर्णय; केरळमधील राष्ट्रवादीच्या आमदाराला डच्चू

अखेर शरद पवारांनी घेतला निर्णय; केरळमधील राष्ट्रवादीच्या आमदाराला डच्चू

Sharad Pawar on farmer protest

Sharad Pawar on farmer protest

केरळ राष्ट्रवादीतील गटबाजीच्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या महिन्यात केरळचा दौरा केला होता.

    केरळ, 15 फेब्रुवारी : केरळातील एलडीफ (LDF) सरकार आणि केरळ राष्ट्रवादीतील गटबाजीच्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद  पवार (Sharad Pawar), राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी गेल्या महिन्यात केरळचा दौरा केला होता. येत्या विधानसभा निवडणुकांसाठी सत्ताधारी एलडीएफ सोबत राहायचे की युडीएफसोबत (UDF) जायचे, यावरुन वाद सुरू आहे. दरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शरद पवार यांच्या सल्ल्यानंतर केरळमधील राष्ट्रवादीचे आमदार मणी सी कप्पन यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डाव्या आघाडीसोबत असलेल्या राष्ट्रवादी पक्षासाठी हा मोठा धक्का आहे. मिळालेल्या माहितीनुसार मणी सी कप्पन यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसच्या नेतृत्वातील यूडीएफमध्ये प्रवेश केला. रविवारी त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर कप्पन यांच्यावर वरिष्ठांकडून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. काय आहे नेमकं प्रकरण? राष्ट्रवादीचे नेते आणि केरळचे परिवहनमंत्री ए के ससिंद्रम विरुद्ध केरळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पी पीठंबरन यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे. पीठंबरन य़ांना आमदार मणी कप्पन यांचा पाठिंबा आहे. येत्या विधानसभा निवडणुकांसाठी सत्ताधारी एलडीएफ सोबत राहायचे की युडीएफसोबत (UDF) जायचे, यावरुन हा वाद आहे. कोणताही निर्णय घेतला तरी पक्षात फूट पडण्याची शक्यता आहे. केरळमध्ये राष्ट्रवादीच्या चार जागा आहेत, मात्र त्या जागा यावेळीही राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता कमी आहे. यातल्या पाला जागेसाठी कप्पन हे आग्रही आहेत. मात्र ही जागा काँग्रेसला मिळण्याचा दावा काँग्रेसी नेत्यांनी केल्याने, कप्पन गट नाराज आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Kerala, Sharad pawar

    पुढील बातम्या