मराठी बातम्या /बातम्या /देश /

शेवटी कान पकडून मागितली माफी; विद्यार्थिनीसोबत छेडछाडीच्या आरोपात BJP माजी आमदाराला अद्दल

शेवटी कान पकडून मागितली माफी; विद्यार्थिनीसोबत छेडछाडीच्या आरोपात BJP माजी आमदाराला अद्दल

भाजपच्या माजी आमदारांवर विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे

भाजपच्या माजी आमदारांवर विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे

भाजपच्या माजी आमदारांवर विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे

  • Published by:  Meenal Gangurde

वाराणसी, 10 जानेवारी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) वाराणसीत छेडछाडीच्या आरोपाखाली भाजपच्या माजी आमदारांना लोकांना मारहाण केली व कान पकडून माफी मागावयास सांगितलं. यासंदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही घटना वाराणसीच्या चौबेपुर पोलीस ठाणे हद्दीतील भगतुआ गावातील आहे. येथे एका इंटर कॉलेजचे चेअरमॅन आणि माजी भाजप आमदार शंकर पाठक यांच्यावर एका विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य करण्याचा आरोप आहे.

पीडित विद्यार्थिनीच्या आरोपांची माहिती मिळताच तिचे कुटुंबीय चिडले. त्यांच्या कुटुंबीयांनी कॉलेजात माजी भाजप आमदार माया शंकर पाठक यांना मारहाण केली आणि याचा एक व्हिडीओ तयार केला. वाराणसी पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे. (Finally grabbed the ear and apologized Former MLA accused of molesting student) माया शंकर पाठक वाराणसीमध्ये कधी भाजप आमदार होते. आणि एमपी इन्स्टीट्यूट अँण्ड कम्पुटर कॉलेज नामक इंटर कॉलेज भगतुआ गावात चालवित होते. सांगितलं जात आहे की, हा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वीचा आहे. आरोप आहे की, माजी भाजप आमदार आणि शाळेचे चेअरमॅन माया शंकर पाठक यांनी आपल्या कार्यालयात बोलावून एका विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य केलं.

हे ही वाचा-धक्कादायक! सोशल मीडियावर सुरू होती चाइल्ड पॉर्नची विक्री; दोघांना अटक

मात्र कोणीच याबाबत पोलीस तक्रार केली नाही, मात्र हा मारहाणीचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. हाय प्रोफाइल प्रकरण असल्या कारणाने पोलिसांनी स्वत: या प्रकरणात तपास सुरू केला आहे.  (Finally grabbed the ear and apologized Former MLA accused of molesting student) याबाब क्षेत्राधिकारी पिंडरा अभिषेक कुमार पांडे यांनी सांगितलं की, अद्याप दोन्ही पक्षांमधून कोणीही तक्रार दाखल केलेली नाही. मात्र व्हिडीओतून सत्य समोर येईल. यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. माया शंकर पाठक 1991 मध्ये वाराणसीतील चिरईगाव विधानसभा भागात भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढले होते.

First published:

Tags: BJP