Home /News /national /

VIDEO: पुढे जेसीबी, मागे चारचाकी अन् काठ्यांनी फोडली दरोडेखोरांची गाडी; सराईत टोळीला फिल्मी स्टाईल अटक

VIDEO: पुढे जेसीबी, मागे चारचाकी अन् काठ्यांनी फोडली दरोडेखोरांची गाडी; सराईत टोळीला फिल्मी स्टाईल अटक

सूरत पोलिसांना चोरांच्या मार्गाची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखण्यासाठी चारही बाजूंनी हल्ला केला. त्यांनी पळून जाऊ नये यासाठी प्रथम त्यांच्या चारचाकी गाडीची काच फोडली गेली.

    सूरत 28 जून : दरोडा टाकणाऱ्या एका सराईत टोळीला पकडण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. ही घटना गुजरातच्या सूरत येथील आहे. क्राईम ब्रँचची ही कारवाई कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चिखलीघर टोळीतील सदस्यांना बारडोलीजवळ फिल्मी पद्धतीने अटक करण्यात आली आहे. चिखलीघर टोळीतील चोर दरोड्यात माहीर आहेत. त्यांना क्राईम ब्रँचने अतिशय प्लॅनिंग करून फिल्मी स्टाईलने अटक केली आहे (Filmy Style Arrest Video). Amarnath Cave : यात्रेआधी समोर आला अमरनाथ गुहेतील शिवलिंगाचा मन प्रसन्न करणारा VIDEO सूरत पोलिसांना चोरांच्या मार्गाची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखण्यासाठी चारही बाजूंनी हल्ला केला. त्यांनी पळून जाऊ नये यासाठी प्रथम त्यांच्या चारचाकी गाडीची काच फोडली गेली. परंतु कारमध्ये बसलेल्या टोळीतील लोकांनी गाडीवर चढण्याचा प्रयत्न केला. कार थांबविण्यासाठी रस्त्यावर आधीच जेसीबी मशीन ठेवण्यात आलं होतं. यामुळे चोर तिथून पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना कार थेट जेसीबीला धडकली. त्याचवेळी चालकाने कार मागे वळवली. यावेळी क्राईम ब्रँचने मागे आपली गाडी उभा केली होती. यामुळे चोरांची कार जीपला धडकी. त्यानंतर तिथे जमलेल्या सगळ्यांनी लाठी-काठीने या चोरांच्या गाडीवर हल्ला केला आणि तिच्या काचा फोडल्या. यानंतर एकापाठोपाठ एक असं सर्व आरोपींना पकडण्यात आलं. हत्ती कारसमोर आल्यावर कारचालकाची उडाली तारांबळ; Forest Officer म्हणाला, अशावेळी 'ही' युक्ती वापरा क्राईम ब्रँचने अगदी प्लॅनिंग करून फिल्मी स्टाईलने या सर्वांना अटक केलं. शेवटी या दरोडेखोरांसमोर पळ काढण्यासाठी कोणताही मार्ग उरलेला नव्हता. या संपूर्ण घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही तो एखाद्या चित्रपटाची आठवण नक्कीच आणून देईल.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Shocking video viral

    पुढील बातम्या