'कमल तो खिला ही हुआ है... देश भी कीचड हो चुका है!'

'कमल तो खिला ही हुआ है... देश भी कीचड हो चुका है!'

अनुरागने एक ट्विट केले आहे जे सध्या व्हायरल होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 एप्रिल: वास्तव घटनांवर चित्रपट निर्मिती करण्यासाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक अनुराग कश्यप सोशल मीडियावर सक्रीय आहे. ट्विटवर अनुराग त्याची मते स्पष्टपणे मांडतो आणि ट्रोलर्सना देखील सडेतोड उत्तर देतो. त्याच अनुरागने एक ट्विट केले आहे जे सध्या व्हायरल होत आहे.

देशात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. यात एका युझरने ट्विट करत अनुरागला टॅग केले होते. या ट्विटमध्ये त्याने, 'कीचड में भी कमल खिलता है, इसलिए कमल का बटन दबाएं'. आता अनुराग या ट्विटवर उत्तर देणार नाही असे तर होणार नाही. अनुरागने त्या युझरला खास शैलीत उत्तर दिले आणि हेच उत्तर सध्या व्हायरल होत आहे.

नेटफ्लिक्सवरील सुपरहिट सीरिज सेक्रेड गेम्सचा दिग्दर्शक अनुरागने म्हणतो, 'कमल तो खिला ही हुआ है... देश भी कीचड हो चुका है!'. अनुरागच्या या उत्तरावर अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. इतक बोलून अनुराग थांबला नाही. 'ट्रोल्स के होश फाख्ता करना बहुत ही आसान है. न सिर्फ उनमें ह्यमूर की कमी होती है, बल्कि वे इस समझने के लिए भी कम अकल होते हैं.', असे दुसरे ट्विट करत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे.

बॉलिवूडमधील अन्य दिग्दर्शकांपेक्षा हटके दिग्दर्शक अशी अनुरागची ओळख आहे. 'सेक्रेड गेम्स' च्या यशामुळे अनुरागचे जगभरात कौतुक होत आहे. अनुरागने ब्लॅक फ्रायडे, सेक्रेड गेम्स, रमन राघव, गुलाल या सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. सेक्रेड गेम्सचा दुसरा सिझन लवकरच येणार आहे.

VIDEO : राज ठाकरेंनी पावणे दोन तास रांगेत उभं राहुन बजावला मतदानाचा हक्क

First published: April 29, 2019, 6:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading