Home /News /national /

कर्ज देणार्‍या कंपनीवर फिल्मी स्टाईल दरोडा; 12 मिनिटांत 17 किलो सोन्यावर मारला डल्ला

कर्ज देणार्‍या कंपनीवर फिल्मी स्टाईल दरोडा; 12 मिनिटांत 17 किलो सोन्यावर मारला डल्ला

सोनं तारण ठेवून कर्ज देणाऱ्या कंपनीवर काही चोरट्यांनी फिल्मी स्टाईल दरोडा टाकला आहे. आरोपींनी अवघ्या 12 मिनिटांत कार्यालयातील 17 किलो सोनं आणि 8.92 लाख रुपयांच्या रोकडवर डल्ला मारला आहे.

    चुरू, 15 जून: सोनं तारण ठेवून कर्ज देणाऱ्या कंपनीवर काही चोरट्यांनी फिल्मी स्टाईल दरोडा (Robbery at lending company office) टाकला आहे. आरोपी चोरट्यांनी कर्जदार बनून कार्यालयात प्रवेश करून अवघ्या 12 मिनिटांत कार्यालयातील 17 किलो सोनं आणि 8.92 लाख रुपयांच्या रोकडवर डल्ला (theft 17 kg of gold in 12 minutes) मारला आहे. यानंतर तेवढ्याच शिताफिने चोरटे पसार देखील झाले. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांना पकडण्यात यश आलं आहे. पोलिसांनी तातडीनं कारवाई करत अवघ्या तीन तासात चोरट्यांना जेरबंद केलं आहे. संबंधित घटना राजस्थानातील चुरू येथील आहे. येथील एका सोनं तारण ठेवून कर्ज देणाऱ्या कंपनीवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. सोमवारी कंपनीच्या कार्यालयात नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होतं. दरम्यान दुपारच्या जेवणाच्या वेळ झाली. याचवेळी पूर्णपणे तोंड झाकलेल्या तरुणांनी कार्यालयात प्रवेश केला. यावेळी कार्यालयात शाखाधिकाऱ्यासोबत अन्य चार कर्मचारीच होत. कोरोनामुळे ग्राहकांनी तोंड झाकलं असावं असं कर्मचाऱ्यांना देखील वाटलं. यावेळी एका चोरट्याने सोनं तारण ठेवून कर्ज घ्यायचं असल्याची बतावणी केली. त्याचबरोबर आपल्याकडील सोन्याची अंगठीही कर्मचाऱ्याकडे दिली. यानंतर संधी साधून चोरट्यांनी कार्यालयाचे सर्व दरवाजे बंद केले. शिवाय कर्मचाऱ्यांचे मोबाईलही हिसकावून घेतले. यानंतर आरोपींनी शस्त्रांचा धाक दाखवत कंपनीतील 17 किलो सोनं आणि 8.92 लाख रुपयांची रोकड लंपास केली. पण अवघ्‍या तीन तासांत पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद केलं आहे. कंपनी बाहेरील सीसीटीव्‍हीमध्‍ये ही फिल्‍मी स्‍टाईल चोरी कैद झाली होती. पोलिसांनी सीसीटीव्‍ही फुटेजवरुन दुचाकीचे नंबर तपासले. हे ही वाचा-परवाना देण्याच्या बहाण्यानं व्यापाऱ्याला फसवलं; जोडप्यानं 40 लाखांना घातला गंडा त्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी शोध सुरू केला. पोलिसांनी राजस्‍थान आणि हरियाणा सीमेवर नाकाबंदीही केली. मात्र चोरट्यांनी चुरू याठिकाणी आपली दुचाकी सोडून कारने धूम ठोकल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. यानंतर पोलिसांनी सुरेवाला चौकात चोरट्यांना अडवलं. पोलिसांनी कारला घेरल्‍यानंतर चोरट्यानं येथूनही पसार होण्याचा प्रयत्‍न केला. मात्र पोलिसांनी 9कोटींच्‍या ऐवजासह 2 चोरट्यांना जेरबंद केलं. अद्याप दोन चोरटे फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Gold robbery, Rajasthan

    पुढील बातम्या