काँग्रेस, गांधी आणि नेहरू कुटुंबाबाबत अपप्रचार करणाऱ्या युट्यूब चॅनल विरोधात गुन्हा दाखल

काँग्रेस, गांधी आणि नेहरू कुटुंबाबाबत अपप्रचार करणाऱ्या युट्यूब चॅनल विरोधात गुन्हा दाखल

अत्यंत हीन दर्जाची भाषा वापरून गांधी-नेहरू परिवाराचा अपप्रचार करण्‍याचा प्रयत्‍न या चॅनेलने केला असल्‍याचे ना. विखे पाटील यांनी आपल्या फिर्यादीत म्‍हटले आहे.

  • Share this:

20 एप्रिल : काँग्रेस, गांधी आणी नेहरू कुटुंबाबाबत अपप्रचार करणाऱ्या युट्यूब चॅनल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील लोणी पोलीस ठाण्यात न्यूज ओन्ली या युट्यूब चॅनल विरोधात गुन्हा दाखल केलाय.

एका युट्यूब चॅनेलच्‍या माध्यमातून धादांत खोटे व्हिडिओ अपलोड करून काँग्रेसचे दिवंगत पंतप्रधान तसंच प्रमुख नेत्यांबाबत जाणीवपूर्वक अपप्रचार होत असल्याच्या विरोधात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी लोणी पोलीस ठाण्‍यात संबंधित व्यक्तींवर देशद्रोहाचा गुन्‍हा दाखल करण्‍याबाबत तक्रार केली आहे.

सदर चॅनेलवर अपलोड करण्‍यात आलेल्‍या एका व्‍हिडीओत काँग्रेस पक्ष आणि पक्षातील प्रमुख नेत्यांबाबत धादांत खोटी, निराधार, द्वेषमूलक माहिती प्रसारीत करून त्यांची प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

अत्यंत हीन दर्जाची भाषा वापरून गांधी-नेहरू परिवाराचा अपप्रचार करण्‍याचा प्रयत्‍न या चॅनेलने केला असल्‍याचे ना. विखे पाटील यांनी आपल्या फिर्यादीत म्‍हटले आहे. अशा चॅनलवर सरकारने कारवाई करत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

First published: April 20, 2018, 9:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading