मराठी बातम्या /बातम्या /देश /

एक्सप्रेसवे वर उतरलं फायटर प्लेन; नागरिक VIDEO करू लागले शूट

एक्सप्रेसवे वर उतरलं फायटर प्लेन; नागरिक VIDEO करू लागले शूट

फायटर प्लेनने पूर्वांचल एक्सप्रेसवेवर उतरल्यानंतर हे दृश्य पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती.

फायटर प्लेनने पूर्वांचल एक्सप्रेसवेवर उतरल्यानंतर हे दृश्य पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती.

फायटर प्लेनने पूर्वांचल एक्सप्रेसवेवर उतरल्यानंतर हे दृश्य पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती.

  • Published by:  Meenal Gangurde

लखनऊ, 14 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पूर्वांचल एक्सप्रेसवेचं (Purvanchal Expressway) उद्घाटन करणार आहेत. यापूर्वी आज रविवारी या एक्सप्रेसवे वर विमानांचं लँडिंग करण्यात आलं. आकाशाला छेदत सी-130 सुपर हरक्यूलिस विमान आणि त्यानंतर एक फायटर प्लेनने पूर्वांचल एक्सप्रेसवेवर उतरल्यानंतर हे दृश्य पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती.

वायु सेना (Indian Air Force) चे लढाऊ विमान जगुआर, मिराज-2000 आणि सुखोई -30 एमकेआय (Sukhoi MK 30) सारखे लढाऊ विमान 16 नोव्हेंबर रोजी सुल्तानपुरमधील पूर्वांचल एक्सप्रेसवेवर टचडाउन अभ्यास करतील.

हा अभ्यास एक्सप्रेसवेवर 3.1 किलोमीटर लांब हवाई पट्टीवर होत आहे. या एक्सप्रेसवेसाठी 42 हजार कोटी खर्च करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी 16 नोव्हेंबर रोजी याचं उद्घाटन करणार आहेत.

हे ही वाचा-Bihar Naxal Attack : नक्षलवाद्यांच्या क्रूरपणाचा कहर, चौघांना फासावर लटकवलं, नंत

या एक्सप्रेसवेमुळे अनेक शहरांना लखनऊपर्यंतचा प्रवास खूप कमी वेळात पार करता येईल. वायु सेनाच्या परिवहन विमान सी-130 जे सुपर हरक्यूलिस (यूएस-निर्मित) पासून एक्सप्रेसवे वर उतरून आपलं कतृत्व दाखवतील.

उत्तर प्रदेश भारतातील पहिलं राज्य आहे, ज्याच्याजवळ दोन एक्सप्रेस-वे हवाई पट्टी आहेत. एक हवाईपट्टी लखनऊ-आग्रा एक्सप्रेसवेवर आणि दुसरी पूर्वांचल एक्सप्रेस-वे वर तयार झाली आहे.

एक्सप्रेसवेवर हवाई पट्टीला लढाऊ जेट विमानांना आपात्कालीन स्थितीत उतरवणे आणि उड्डाण करण्यासाठी डिजाइन करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Air india, Live video, Uttar pardesh