लखनऊ 04 ऑक्टोबर : नवीन कृषी कायद्यांविरोधात (New Farm Law) आंदोलनाला (Farmers Protest) आता हिंसक वळण येऊ लागलं (Fight between Farmers and BJP workers) आहे. शेतकऱ्यांनी उत्तर प्रदेशत्या लखीमपूर खीरीमध्ये (Lakhimpur Kheri Incident) केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या 2 कारला आग लावली. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 4 शेतकरी तर 4 भाजप कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
Four farmers and four others have died (in the Lakhimpur Kheri incident). Probe underway. It's an unfortunate incident, should not be politicised...: Arvind Kumar Chaurasiya, DM, Lakhimpur Kheri pic.twitter.com/Dg5FZNYZCM
— ANI UP (@ANINewsUP) October 3, 2021
या घटनेनंतर शेतकऱ्यांना भेटण्यासाठी निघालेल्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी हरगावमध्येच अटक केली (Priyanka Gandhi Vadra Arrested) असल्याचं युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही यांनी म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य़ (Keshav Prasad Maurya) रविवारी लखीमपुर खीरीमध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांचं गाव बनवीरपुर येथे जात होते. त्यांनाच रिसीव्ह करण्यासाठी अजय मिश्रांचा मुलगा आशिष मिश्रा घरातून बाहेर पडले होते. याचदरम्यान आशिष मिश्रा आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका गाडीला शेतकऱ्यांनी अडवलं. शेतकरी त्यांच्याकडे नवीन कृषी कायदे माघारी घेण्याची मागणी करत होते.
भारताने ब्रिटनला चांगलाच धडा शिकवला, पाकिस्तानी मीडियाकडून मोदी सरकारचं कौतुक
शेतकऱ्यांपासून वाचण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) यांनी ड्रायव्हरला स्पीड वाढवण्यास सांगून तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान काही शेतकरी गाडीच्या समोर आली. यामुळे 8 जणांचा मृत्यू झाला. यानंतर नाराज शेतकऱ्यांनी मंत्र्याच्या मुलाच्या दोन गाड्या पेटवून दिल्या (Farmers burned vehicles of BJP workers).
Youth Congress National President Srinivas BV claims "Priyanka Gandhi Vadra arrested from Hargaon." pic.twitter.com/PzmLiEUvUI
— ANI UP (@ANINewsUP) October 4, 2021
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनी झी मीडियाशी बोलताना सांगितलं की, या घटनेत ठार झालेले 4 जण हे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी आरोप केला की, काही लोकांनी वाहनांवर दगडफेक केली आणि 4 लोकांना मारहाण केली. त्यांनी दावा केला, की घटनेच्या वेळी त्यांचा मुलगा घटनास्थळी नव्हता. याचे व्हिडिओ स्वरुपातील पुरावे त्यांच्याकडे आहेत.
शेतकऱ्यांच्या अंगावर भाजप कार्यकर्त्यांनी घातली कार, आंदोलक झाले आक्रमक
या घटनेच 8 लोकांचा मृत्यू झाल्यानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रात्री उशिरा लखनऊमध्ये मुख्य सचिन आणि डीजीपी यांच्यासोबत उच्चस्तरिय बैठक घेतली. त्यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं. ते म्हणाले की, दोषींचा पर्दाफाश केला जाईल. यूपी सरकारने एक निवेदन जारी करून म्हटलं आहे की ते या घटनेच्या कारणांच्या तळाशी जाईल. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं सरकारनं सांगितलं. त्याचबरोबर जनतेला घरातच राहण्याचे आणि कोणाचीही दिशाभूल न करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Farmer protest, Uttar pradesh