'कोरना'मुळे लग्नाचे वाजले बारा, घरातच अडकल्याने नवरा-नवरींनी Laptop समोर लावलं लग्न

'कोरना'मुळे लग्नाचे वाजले बारा, घरातच अडकल्याने नवरा-नवरींनी Laptop समोर लावलं लग्न

इंटरनेटच्या माध्यमातून दोघही लाईव्ह आले. मग काजींनी पवित्र मंत्रांचं पठन केलं त्यानंतर दोघांचं लग्न लागलं.

  • Share this:

पाटणा 24 मार्च : कोरोनामुळे सगळा देशच घरात बंद झालाय. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून देशातल्या जवळपास सर्वच राज्यांनी लॉकडाउन केलं आहे. तर अनेक राज्यांमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आलीय. त्यामुळे सगळ्यांनाच फटका बसला आहे. बिहारमध्ये एक लग्न चक्क लॅपटॉपच्या साह्याने करावं लागलं. कारण वऱ्हाड नवरीच्या गावी पोहोचू शकलं नाही. त्यामुळे मग लॅपटॉप समोर नवरा नवरी लाईव्ह उभे झाले आणि मग निकाह पार पडला.

पाटण्याच्या सादिया नसरीनचा निकाह हा उत्तर प्रदेशातल्या साहिबाबादच्या दानिश रजा याच्यासोबत ठरला होता. दोघही लग्न आणि त्यानंतरच्या संसाराची स्वप्न पाहात होते. 23 मार्चला दोघांचा निकाह ठरला होता. मात्र लॉकडाउनमुळे वऱ्हाड जावू शकलं नाही. आणि नवरदेवालाही येता आलं नाही.

या लॉकडाउनमुळे लग्न राहू नये म्हणून मग दोन्हीकडच्या मंडळींनी त्यावर उपाय काढला. इंटरनेटच्या माध्यमातून दोघही लाईव्ह आले. मग काजींनी पवित्र मंत्रांचं पठन केलं त्यानंतर दोघांचं लग्न लागलं. आता या लग्नानंतर नवरी आणि नवरा केव्हा भेटणार हे त्या दोघांनाही माहित नाही.

'मी आज काही बंद करायला आलेलो नाही' , मुख्यमंत्र्यांनी केली सहकार्याची अपेक्षा

देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. देशातल्या रुग्णांचा आकडा आज 519वर पोहोचला अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक 107 तर केरळमध्ये 87 जणांचा समावेश आहे. सख्या वाढत असल्याने जवळपास सरर्वच राज्यांनी लॉकडाउन केलं असून अनेक राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

दुबई येथे नोकरीस असलेल्या तरुणीचा शिर्डीत मुक्काम, तातडीने रुग्णालयात हलवलं

अशातच मुंबईत आणखी एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेला 65 वर्षीय व्यक्ती नुकताच युएई येथून मुंबईत आला होता. या व्यक्तीला ताप, खोकला आणि श्वसनासाठी त्रास होत असल्याने 23 मार्च रोजी मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

 

First published: March 24, 2020, 7:24 PM IST

ताज्या बातम्या