Home /News /national /

VIDEO : TeamMaskForce सचिन पासून कोहली पर्यंत सगळ्यांनी तयार केले मास्क, तुम्हीही सहभागी व्हा

VIDEO : TeamMaskForce सचिन पासून कोहली पर्यंत सगळ्यांनी तयार केले मास्क, तुम्हीही सहभागी व्हा

तुम्हीही आपल्या घरीच उपलब्ध असलेल्या स्वच्छ कापडापासून मास्क बनवू शकता हे या दिग्गजांनी सांगितलं आहे.

    नवी दिल्ली 19 एप्रिल: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काळजी घेणं हाच सगळ्यात मोठा उपाय आहे. कारण अजुनही त्याच्यावर औषध सापडलेलं नाही. त्यामुळे वारंवार हात धुणे आणि तोंडावर मास्क लावणं याची आता सगळ्यांनीच सवय करून घेणं आवश्यक आहे असं वारंवार सांगितलं जात आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृतीही करण्यात येत आहे. तुम्ही आपल्या घरीच मास्क तयार करू शकता आणि वापरू शकता हा संदेश देण्यासाठी BCCIने एक VIDEO तयार केलाय. दिग्गज क्रिकेटपटूंनी TeamMaskForce तयार करत त्यात देशवासियांनी सहभागी व्हावं असं आवाहन केलं आहे. कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर जगभरच मास्कचा तुटवडा निर्माण झाला. कारण प्रत्येकालाच मास्क हवे होते. त्यामुळे त्याच्या किंमतीही वाढल्या होत्या. पण हेच मास्क घरीही बनविता येतात आणि त्याचा वापरही उत्तम पद्धतीने करता येतो हे आता सांगितलं जात आहे. त्यामुळे मास्क खरेदी करण्यासाठीची गर्दी कमी होईल आणि ते मास्क कोरोनाच्या लढ्यात काम करणाऱ्या लोकांसाठी वापरायला कामी येतील असं मत व्यक्त केलं जातंय. याच मोहिमेचा भाग म्हणून आजी माजी क्रिकेटपटूंनी एक व्हिडीओ तयार केला आहे. त्यात सचिन तेंडुलकर, विराट कोहली, सौरभ गांगुली, राहूल द्रविड अशा दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. TeamMaskForce असं नाव देण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या खेळाडूंचं कौतुक करत सगळ्यांना या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. असं असलं तरी काही दिलासादायक घटना घडत आहेत. देशातल्या 12 राज्यांमधल्या 22 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण आढळला नाही अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या 24 तासांमध्ये 991 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 43 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 14,378वर तर मृत्यूचा आकडा 480वर गेला आहे. यात 4,291 जण हे तबलिगी जमातशी संबंधीत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Sachin tendulkar

    पुढील बातम्या