रहिवासी परिसरात कोसळलं पाकिस्तानी सैन्याचं विमान, 17 जणांचा मृत्यू

रहिवासी परिसरात कोसळलं पाकिस्तानी सैन्याचं विमान, 17 जणांचा मृत्यू

पाकिस्तानी सैन्याचं विमान रहिवाशी परिसरात कोसळल्यानं भीषण दुर्घटना झाली आहे. यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 30 जुलै : पाकिस्तानी सैन्याचं विमान रहिवाशी परिसरात कोसळल्यानं भीषण दुर्घटना झाली आहे. यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (30 जुलै) पहाटेच्या सुमारास रावळपिंडीतील गरारी शहराजवळ हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये पाच पाकिस्तानी सैनिकांचा समावेश आहे. घटनास्थळावर सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. पण दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी माहिती मदतकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. कारण जखमींची प्रकृती गंभीर आहे.

(पाहा :VIDEO: देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार आमने-सामने, सकाळच्या टॉप 18 बातम्या)

दरम्यान, विमान कोसळण्यामागील नेमकं कारण अद्याप पाकिस्तानी सैन्यानं सांगितलेलं नाही.  नियमित स्वरुपातील सराव सुरू असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती पाकिस्तानी सैन्यानं दिली आहे. मोरा कालू गावात हे विमान कोसळलं आहे.

(पाहा :SPECIAL REPORT: नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस औषधालाही सापडणार नाही?)

1122 आपत्कालीन सेवा अधिकाऱ्यांची माहिती

1122 आपत्कालीन सेवेचे अधिकारी फारूक बट यांनी सांगितलं की, विमान दुर्घटनेत सैनिकांसह 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 20 जण गंभीर जखमी झाले आहेत.  घटनास्थळावर सध्या बचावकार्य सुरू आहे. पण हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे समजू शकलेलं नाही.

(पाहा :VIDEO: पुण्यातील बहुचर्चित बलात्कार-खूनप्रकरणी आरोपींची फाशीची शिक्षा रद्द!)

पुण्यातील 'या' बँकेने थकवले 9 कोटी रुपये, भाजपच्या मंत्र्यामुळे कारवाई नाही?

First published: July 30, 2019, 8:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading