9 महिन्यांचं बाळ, 4 वर्षांची लहानगी आणि आई आगीच्या भक्ष्यस्थानी, अंगावर काटा आणणारं अग्नितांडव

9 महिन्यांचं बाळ, 4 वर्षांची लहानगी आणि आई आगीच्या भक्ष्यस्थानी, अंगावर काटा आणणारं अग्नितांडव

आग लागल्यानंतर बराच वेळ यांना मदत मिळू शकली नाही.

  • Share this:

सरकाघाट (मंडी), 17 जून : हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात बुधवारी भीषण आगीत (एफआयआरई) आई, मुलगी आणि मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला. यादरम्यान बहुतांश जण गावाबाहेर गेले असल्याने पुरेशी मदत मिळण्यात बराच वेळ गेल्याचे सांगितले जात आहे. हा अपघात दुपारी एक ते दुपारी दोन दरम्यान घडल्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 24 वर्षांची कविता देवी आपल्या 9 महिन्यांच्या मुलाला आरोग्य केंद्रात लस टोचण्यासाठी घेऊन गेली होती. लसीकरणानंतर घरी पोहोचल्यानंतर कविता आपला मुलगा आणि 4 वर्षाच्या  मुलीसह विश्रांती घेत होती. अचानक घरात आग लागली आणि पाहताच आगीने विशाल रुप धारण केले.

या गावातल्या लोकांना सरकारी रेशनसाठी आगारात बोलावण्यात आले होते, त्यामुळे गावात मोजकेच लोक उपस्थित होते. आगीच्या घटनेची माहिती लोकांना मिळाली तोपर्यंत सर्व काही जळून खाक झाले होते. त्या महिलेचे आणि तिच्या मुलांच्या मृतदेहाचे काही अवशेष मिळाले आहेत. ही आग दोन मजल्यांच्या घराला लागली होती, परंतु वरच्या मजल्यावर अधिक नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

डीएसपी सरकाघाट चंद्रपाल सिंग यांनी सांगितले की या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मृतांच्या मृतदेहाचे काही अवशेष एकत्र करीत त्यांना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. गुन्हा नोंदवल्यानंतर आता पुढील कारवाई सुरू आहे.

हे वाचा-धक्कादायक! भारतीय महिला क्रिकेटपटूची गळफास लावून आत्महत्या

Unlock 1.0 : अवघ्या 15 दिवसात 4500 मृत्यू; या राज्यात सर्वाधिक परिणाम

 

संपादन - मीनल गांगुर्डे

First published: June 17, 2020, 6:30 PM IST
Tags: fire

ताज्या बातम्या