मराठी बातम्या /बातम्या /देश /

मजुराने हज यात्रेसाठी साठवले होते पैसे, आता त्याच पैशातून गरीबांना करतोय मदत

मजुराने हज यात्रेसाठी साठवले होते पैसे, आता त्याच पैशातून गरीबांना करतोय मदत

आयुष्यभर कमाईतून एक एक करून पैसे साठवले. लॉकडाऊनमुळे सगळंच रद्द झालं आणि जेव्हा लोकांना उपाशी पाहिलं तेव्हा मदतीसाठी ते खर्च करायचे ठरवलं.

  • Published by:  Suraj Yadav
बेंगळुरू, 26 एप्रिल : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद झाले. यामुळे मोलमजुरी करून उदरनिर्वाह कऱणाऱ्यांना अनेक अडचणी येत आहे. अशा लोकांना मदतीसाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. आता कर्नाटकात शेतात काम करणाऱ्या अब्दुर रहमान यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. आयुष्यभर एकच स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं होतं ते म्हणजे हज यात्रेला मक्का-मदीना इथं जायचं. यावर्षी ते जाणारही होते. पण  कोरोनामुळे सगळं रद्द झालं. हजला जाण्यासाठी साठवलेले पैसे आता त्यांनी लोकांच्या मदतीसाठी खर्च करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. अब्दुर रहमान यांनी आयुष्यभर कमाईतून एक एक करून पैसे साठवले. त्यांनी हजला जाण्याची पूर्ण तयारी केली असतानाच कोरोना व्हायरसनं सगळंच रद्द करावं लागलं. त्यानंतर त्यांनी हज यात्रेला जाण्यासाठी साठवलेली रक्कम आता ज्यांना जेवण मिळत नाही अशा लोकांसाठी खर्च करणार आहेत. मेंगलोरमधील बंतवाल इथं राहणाऱ्या अब्दुर रहमान यांनी आतापर्यंत 25 लोकांना मदत केली आहे. ज्यांच्याकडे धान्य नाही त्यांना तांदूळ आणि इतर साहित्य दिलं. ते म्हणतात की, मला खूप वाईट वाटलं जेव्हा हातावर पोट असलेल्या लोकांना लॉकडाऊनमध्ये घरी बसावं लागलं. त्यानंतर मी अशा लोकांना मदत करायचा निर्णय घेतला. हे वाचा : लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडला नवरदेव, पोलिसांनी चेकपोस्टवरच लावून दिलं लग्न अब्दुर रहमान यांनी मदत करण्यासाठी किती खर्च झाला हे सांगितलं नाही. तेसुद्धा शेतात मोलमजुरी करतात. गेल्या कित्येक वर्षांपासून हज यात्रेला जाण्याचं त्यांच स्वप्न होतं. त्यासाठी पैसेही साठवले होते. लॉकडाऊनमुळे सगळंच रद्द झालं. त्याचवेळी जेव्हा गरीब लोकांना उपाशी पाहिलं तेव्हा मदत करण्यासाठी ते पुढे आले. हे वाचा : कोरोनाग्रस्त महिलेनं दिला बाळाला जन्म, VIDEO कॉलवर चिमुकल्याला बघते आई संपादन - सूरज यादव
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या