मराठी बातम्या /बातम्या /देश /

लग्नाची पत्रिकाही होती छापली, भावी नवऱ्यानं केला विश्वासघात; बेडरुममध्येच 4 फूट खोल खड्ड्यात पुरला मृतदेह

लग्नाची पत्रिकाही होती छापली, भावी नवऱ्यानं केला विश्वासघात; बेडरुममध्येच 4 फूट खोल खड्ड्यात पुरला मृतदेह

ही युवती लग्नासाठी अडून बसल्यानं तिच्या नियोजित पतीनं तिला त्याच्या घरी बोलावलं. या वेळी दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा खुलासा चौकशी पूर्ण झाल्यानंतरच होईल असं सूत्रांनी सांगितलं.

ही युवती लग्नासाठी अडून बसल्यानं तिच्या नियोजित पतीनं तिला त्याच्या घरी बोलावलं. या वेळी दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा खुलासा चौकशी पूर्ण झाल्यानंतरच होईल असं सूत्रांनी सांगितलं.

ही युवती लग्नासाठी अडून बसल्यानं तिच्या नियोजित पतीनं तिला त्याच्या घरी बोलावलं. या वेळी दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा खुलासा चौकशी पूर्ण झाल्यानंतरच होईल असं सूत्रांनी सांगितलं.

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : गुन्हेगारी विश्वात अनेक घटना घडत असतात. सध्या माध्यमांमुळे त्या पटकन लोकांपर्यंत पोहोचतात. पूर्वी गुन्ह्यांसबंधी केवळ वृत्तपत्रं होती पण आता अनेक टीव्ही चॅनलवर या विषयातील कार्यक्रम दाखवले जातात. यामध्ये गुन्हा कसा घडला, पोलिसांनी त्याची उकल कशी केली आणि कुठल्या परिस्थितीमुळे किंवा हेतूने गुन्हेगाराने हा गुन्हा केला याची इत्यंभूत माहिती दाखवली जाते. त्यामुळे गुन्हा या विषयातलं कुतूहल आणखी चाळावतं. पंजाबमध्ये नुकतीच अशी एक घटना घडली. यात एका महिलेचा तिच्या भावी नवऱ्यानं (Fiance) निर्घृण खून (Murder) केल्याचं स्पष्ट झालं आहे. या गुन्ह्याचा पोलीस तपास सुरू आहे. या घटनेचं वृत्त `दैनिक भास्कर`ने दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 11 ऑक्टोबरला भटिंडावरून पटियाला (Patiala) येथे लग्नासाठी (Wedding) खरेदीकरिता आलेल्या बेपत्ता युवतीचा मृतदेह अर्बन इस्टेट फेज-1मधील एका खोलीत आढळून आला. या युवतीचा मृतदेह (Dead Body) आरोपीनं बेडरुममध्ये चार फूटाचा खड्डा खणून त्यात पुरला होता. पोलिसांनी हा मृतदेह नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृत्यूच्या कारणाबाबत पोलिसांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ही युवती लग्नासाठी अडून बसल्यानं तिच्या नियोजित पतीनं तिला त्याच्या घरी बोलावलं. या वेळी दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा खुलासा चौकशी पूर्ण झाल्यानंतरच होईल असं सूत्रांनी सांगितलं. हेही वाचा- सांगलीतील महिलेनं Amazon कंपनीला घातला 28 लाखांचा गंडा; 5 महिन्यांपासून करत होती फसवणूक
 मिळालेल्या माहितीनुसार, अर्बन इस्टेट फेज-1 मध्ये राहणारी नवनिंदरप्रीत पाल ही एलएलबीचं (LLB) शिक्षण घेत होती. दरम्यान तिच्या सोबत शिक्षण घेत असलेल्या छपिंदरपालसिंगसोबत तिचे मैत्रीचे संबंध जुळले. त्यानंतर त्यानं त्याच्या कुटुंबियांना न सांगता आणि केवळ नवनिंदरप्रीत हिच्या कुटुंबियांशी बोलून 2020 मध्ये तिच्याशी साखरपुडा केला. त्यानंतर स्वतःच्या कुटुंबियांच्या संमतीनं 20 ऑक्टोबर ही तारीख विवाहासाठी निश्चित केली. विवाहानिमित्तानं निमंत्रण पत्रिकाही छापण्यात आल्या. 11 ऑक्टोबर 2021ला आरोपीनं वाग्दत्त वधूला विवाहाची खरेदी करण्याकरिता पटियाला येथे बोलून घेतलं आणि दोन दिवस गुरुव्दारा दुख निवारण साहिबनजीकच्या हॉटेलमध्ये ठेवलं. तिच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, त्यांचं 11 ते 13 ऑक्टोबरपर्यंत तिच्याशी बोलणं झालं. पण 14 ऑक्टोबरला आरोपीनं तुमची मुलगी माझ्याशी किरकोळ भांडण करून एकटीच खरेदीला बाहेर पडली आहे, आणि मोबाईल माझ्याकडेच ठेवला आहे, असं सांगितलं.
हेही वाचा-  नगरच्या लेखाधिकाऱ्यानं लाचखोरीतून कमवली लाखोंची मालमत्ता; घरात 11 लाख रोकडसह आढळलं इतकं सोनं
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला अटक केल्यानंतर त्याने पोलिसांना (Police) चुकीची माहिती देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर बुधवारी रात्री हत्या केल्याचं कबूल केलं. मात्र मृतदेहाची कशी विल्हेवाट लावली याबाबत मात्र त्यानं चुकीची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याच्याकडून सत्य बाहेर काढलं त्यानंतर त्यानी खरी माहिती सांगितली. आरोपीनं नवनिंदरप्रीतची हत्या केल्यानंतर खोलीतच रात्री उशिरा खड्डा खोदण्याकरता हातमोजे आणि दगड, माती डोळ्यात जाऊ नये यासाठी चष्मा घातला होता. खड्डा खोदताना आवाज होऊ नये, यासाठी खोलीतील टीव्हीचा आवाज मोठा केला. बेडरुममधील मार्बल जुने आणि कठीण असल्यानं खड्डा खणण्यास खूप वेळ लागला. मृतदेह खड्ड्यात पुरल्यावर खड्डा प्लॅस्टरने बेमालूम बुजवला आणि त्यावर मॅट अंथरून बेड लावून टाकला. बेडरुममध्ये 4 फूट खोल आणि अडीच फूट रुंदीच्या खड्ड्यात मृतदेह गुडघ्याच्याबाजूनं पुरण्यात आला होता. नवनिंदरपालची उंची जास्त होती. त्यामुळे तिचे हातपाय जबरदस्तीनं वाकवण्यात आले होते. हा मृतदेह सात दिवसांपूर्वी पुरण्यात आला होता आणि त्यावर जखमेच्या खुणा होत्या. मृतदेहाचा वास येऊ नये यासाठी इंटरनेटवरून माहिती घेत मृतदेह डिकंपोज करण्यासाठीच्या रसायनाची (Chemical) माहिती आरोपीनं घेतली होती. त्याचा वापरही त्याने केला. मात्र ही माहिती आरोपी पोलिसांपासून लपवत होता. शेवटी `सीआयई`च्या पथकानं सखोल चौकशी केली असता, आरोपीनं तोंड उघडलं आणि मृतदेह खड्ड्यात पुरल्याचं कबूल केलं. हेही वाचा-  नौदलातील पतीने तिच्या मानेवर पाय ठेवला अन्...; लेकीच्या मृत्यूनंतर पित्यानं सांगितली व्यथा
 त्यानंतर गुन्ह्याचं (Crime) प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी पोलिसांनी आरोपीला सकाळी 7 वाजता घटनास्थळी नेलं. वडील निवृत्त लेफ्टनंट कर्नल बलवंतसिंग यांना घटनास्थळी आरोपीसोबत बसवण्यात आले. यावेळी वडिलांनी आरोपीला सर्व घटना कथन करण्यास सांगितलं. घटनेवेळी आई-वडिल कुठे होते, याची माहिती पोलिसांनी दिलेली नाही. घटनास्थळी नायब तहसीलदार मनमोहनसिंग, अर्बन इस्टेट, धान्य बाजार आणि त्रिपडी ठाण्याचे पोलीस कर्मचारी, तसेच डीएसपी मोहित अग्रवाल, डीसीपी सीटी सौरव जिंदल, सीआयए इन्चार्ज उपस्थित होते. मुलीची हत्या झाल्याचं समजताच तिचे वडील सुखचैनसिंग वीरवार पटियाला येथे पोहोचले मात्र त्यांना मृतदेह ताब्यात मिळाला नव्हता. आज डॉक्टरांचं पथक शवविच्छेदन करेल त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल. सूत्रांच्या माहितीनुसार, कलम 364 व्यतिरिक्त आधी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये खुनाचे कलमही लावण्यात आले आहे. तसेच या हत्येत आणखी कोण सहभागी आहे, याचा तपास पोलिस करत आहेत.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Crime news

पुढील बातम्या