मराठी बातम्या /बातम्या /देश /

नववधूच्या हातावरील मेहंदीचा रंग उतरण्यापूर्वीच नवरदेवाचा कोरोनानं मृत्यू

नववधूच्या हातावरील मेहंदीचा रंग उतरण्यापूर्वीच नवरदेवाचा कोरोनानं मृत्यू

मुलीकडील लोकांनीही हा प्रस्ताव मंजूर करत, आपल्या मुलीचं लग्न त्या वऱ्हाडी म्हणून आलेल्या मुलाशी लावून दिलं.

मुलीकडील लोकांनीही हा प्रस्ताव मंजूर करत, आपल्या मुलीचं लग्न त्या वऱ्हाडी म्हणून आलेल्या मुलाशी लावून दिलं.

लग्नाच्या दुसर्‍या दिवशीच्या मिरवणुकीतून परत आल्यानंतरच नवरदेवाला ताप येऊ लागला. कुटुंबीयांनी स्थानिक पातळीवर उपचार केले. परंतु, त्याची गंभीर स्थिती पाहता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथेच त्याचा मृत्यू झाला.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 18 मे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळं (Corona Second Wave) देशात सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे यासाठी वारंवार प्रशासनाकडून सूचना देण्यात येत असल्या तरी काही नागरिकांकडून त्याचे उल्लंघन होत असून त्याचा फटकाही त्यांना सहन करावा लागत आहे. असेच काहीसे उदाहरण गोपाळगंजमध्ये घडले आहे. कोरोना नियम (Corona Protocol) डावलून लग्नसमारंभ केलेल्या एका नवरदेवाचा बायकोच्या हातावरील मेहंदी उतरण्याअगोदरच मृत्यू झाला आहे.

मृत्यू झालेला नवविवाहित होता शिक्षक

ही घटना कटेयामधील रुद्रपूर गावची आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सीएम नितीशकुमार (CM Nitish Kumar) यांनीदेखील लोकांना सामूहिक लग्नांचे कार्यक्रम पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे. कटेयाच्या रुद्रपूर गावात 28 एप्रिल रोजी एका शिक्षकाचे लग्न झाले होते. मात्र, दुर्दैवानं बायकोच्या हातावरील मेहंदीचा रंग उतरण्यापूर्वीच नवरदेवाचा कोरोनामुळं मृत्यू झाला.

" isDesktop="true" id="552534" >

रुद्रपूर गावात राहणारे दिवंगत रामचंद्र पांडे यांचा लहान मुलगा दुर्गेश पांडे हा काटेया ब्लॉकमधील ज्ञानेश्वरी हायस्कूल गौरा बाजार येथे तासिक तत्वावर शिक्षक म्हणून नोकरीस होता. 28 एप्रिल रोजी पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बागहा बंकटवा येथील दिवंगत चंद्रभूषण मिश्रा यांची मुलगी प्रियंका मिश्राशी त्याचे लग्न झाले. 29 एप्रिल रोजी लग्नाच्या दुसर्‍या दिवशी मिरवणूक परत आल्यानंतर दुर्गेश पांडेला ताप येऊ लागला. त्याच्यावर त्याच्या कुटुंबीयांनी स्थानिक पातळीवर उपचार केले. परंतु, त्याची गंभीर स्थिती पाहता 5 मे रोजी कुटुंबीयांनी त्याला गोरखपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जेथे उपचार सुरू असताना 15 मे रोजी त्याचा मृत्यू झाला.

हे वाचा - ‘आधार’मध्ये दिलेला जुना मोबाइल नंबर बंद झालाय? जाणून घ्या नंबर अपडेट करण्याची सोपी पद्धत

त्याच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांसह संपूर्ण गावावर शोककळा पसरली. घाईघाईत स्थानिक प्रमुख आणि कुटुंबीय गोरखपूरला पोहोचले, कोरोना प्रोटोकॉलअंतर्गत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूची बातमी समजताच मृताच्या पत्नीला धक्का बसला असून ती गोंधळलेल्या अवस्थेत आहे. पत्नी प्रियांका मिश्रानं अद्याप तिचा नवरा व्यवस्थित पाहिलाही नव्हता किंवा तिचा सासरच्या घरातील कोणाचा नीट परिचयही झाला नव्हता. पण, लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर तिच्या पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याचा मृत्यू झाला. अशा बिकट परिस्थितीत तिच्यावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे.

First published:

Tags: Bihar, Corona updates, Corona virus in india, Coronavirus