श्योपुर, 15 सप्टेंबर :कोरोना काळात लॉकडाऊन लागू असल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून ऑनलाइन अभ्यासक्रम शिकवला जात आहे. यासाठी तर अनेक पालकांनी आपल्या मुलांना नवा स्मार्टफोनही खऱेदी करू दिले जात आहे. अशात मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) शाळा बंद असल्याने ऑनलाइन क्लासदरम्यान (Online Class) पॉर्न व्हिडीओ क्लिप शेयर झाल्याची घटना समोर आली आहे.
मध्य प्रदेशातील श्योपुर जिल्ह्यातील आठवीच्या वर्गातील व्हॉट्सअॅप (WhatsApp) ग्रुपवर अश्लील क्लिप शेअर करण्यात आली. यानंतर शाळेने सर्व वर्गांकडून चालवले जाणारे ऑनलाइन वर्ग बंद करण्याचा आदेश दिला आहे. मीडिया रिपोटर्सनी दिलेल्या माहितीनुसार शाळेतील आठवी वर्गातील मुलांचा इंग्रजी विषयाचा ऑनलाइन वर्ग सुरू होता. यादरम्यान अचानक शाळेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अश्लिल व्हिडीओ शेअर झाला. सध्या जगभरात विविध ठिकाणी ऑनलाइन वर्ग आणि कार्यालयही वर्क फ्रॉम होम सुरू आहे. शाळेचे वर्गच ऑनलाइन असल्याने आता लहान मुलांच्या हातात क्लासेसच्या नावाने हक्काचा स्मार्ट फोन आला आहे. यापूर्वीदेखील अशा प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत.
हे ही वाचा-आता काय म्हणावं! कुत्र्यांची भांडणं; बॉलिवूड अभिनेत्याने बायकोला दिला घटस्फोट
शाळेच्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर ऑनलाइन क्लास सुरु असताना ही घटना घडली. यानंतर शाळेने तत्काळ ऑनलाइन क्लासेस बंद केले. यानंतर विद्यार्थी संघटनेच्या एनएसयूआयने शाळेच्या व्यवस्थापकांविरोधात मोर्चा काढला आहे.
हे ही वाचा-कोरोनाच्या संकटकाळातही 1 ऑक्टोबरपासून देशभरात उघडणार सिनेमागृह?वाचा काय आहे सत्य
महिला शिक्षक घेत होत्या वर्ग
मिळालेल्या माहितीनुसार सेंटपायस शाळेत शनिवारी आठवीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा ऑनलाइन क्लास सुरू होता. त्याचवेळी व्हॉट्सअॅवर अश्लिल व्हिडीओ येऊ लागले. अचानक व्हिडीओ सुरू झाल्याने मुलं घाबरली व पालकांनी हे पाहिल्यानंतर तत्काळ मोबाइल बंद केला. याबाबत शाळेच्या व्यवस्थापकांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी सांगितले की, यावर तपास केला जात असून बाहेरील कोणीतरी अशा स्वरुपाचं कृत्य केलं आहे.