पाकिस्तानचा हवाई हल्ला परतवण्यासाठी अभिनंदन यांना 'या' महिलेने केली मदत

पाकिस्तानचा हवाई हल्ला परतवण्यासाठी अभिनंदन यांना 'या' महिलेने केली मदत

भारतीय पायलट पाकिस्तानच्या विमानांना सीमेवरच पाडून आले. यावेळी विंग कमांडर अभिनंदन यांची खूप चर्चा झाली.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 एप्रिल : बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पोकिस्तानने जेव्हा भारतावर बदला घेण्याच्या भावनेनं पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मोठ्या शर्तीने हा हल्ला असफल करण्यात आला. यावेळी भारतीय पायलट पाकिस्तानच्या विमानांना सीमेवरच पाडून आले. यावेळी विंग कमांडर अभिनंदन यांची खूप चर्चा झाली.

पण हा हल्ला हाणून पाडण्यासाठी ज्या लोकांचा समावेश आहे यात एक नाव गुप्त आहे. यामध्ये एक महिला स्क्वाड्रन लीडरसुद्धा होत्या. ज्यांनी अनेक अशक्य गोष्टींना साधत हल्ला परतवून लावला. सध्या या महिला ऑफिसरचं नाव समोर आलेलं नाही आणि सुरक्षेच्या दृष्टीने नाव गुपित असलेलंच बरं. पण त्यांच्या या  शौर्याचा गौरव करण्याचं भारतीय हवाई दलानं ठरवलं आहे. हवाई दलाच्या एका विशिष्ट मेडलद्वारे त्यांना पुरस्कृत करण्यात येणार आहे.

पाकिस्तानी विमानांनवर ठेवलं बारीक लक्ष

या महिला स्क्वाड्रन लीडरने हवाई दलामजध्ये फायटर कंट्रोलरची भूमिका निभावली आहे. सध्या त्या पंजाबमध्ये असलेल्या आयएएफच्या एका रडार कंट्रोल स्टेशनवर काम करत आहेत. 27 फेब्रुवारी रोजी 24-एफ-16, जेएफ -17 एस आणि मिराज -5 ने पाकिस्तानने हल्ला केला, तेव्हा स्क्वाड्रन लीडरने तणावपूर्ण वातावरण हाताळलं आणि भारतीय लष्करी पायलटांना पाकिस्तानी विमानाबद्दल सतत जागृत ठेवलं.

पाकिस्तान हल्ला करेल, ते आधीच स्पष्ट होतं

त्या दिवशी सकाळी वायुसेनाकडून इनपुट मिळत होतं की पाकिस्तान हल्ला करण्यासाठी तयार आहे. त्यानंतर 9.45 पर्यंत हे स्पष्ट झालं की पाकिस्तान वायुसेनेने लढाऊ विमानांना नियंत्रण रेखावर पाठवलं. त्यानंतर काही वेळातच, पाकिस्तानच्या हवाई दलातील 4 विमानांनी राजोरीच्या कलाल भागातून सीमा रेषा क्रॉस केली.

त्यावेळी स्क्वाड्रन लीडरने वेळ न दवडता नियंत्रण कक्षमधून 2 सुखोई आणि 2 मिराज विमानांना अलर्ट दिला. जेव्हा पाकिस्तानकडून विमानं येत आहेत असे पाहिलं तेव्हा त्यांनी 6 मिग्स विमानांना जवळच्या एअरबेस (श्रीनगर) येथून उड्डाण करण्यास सांगितलं. अचानक मिग विमानांच्या येण्यानंतर पाकिस्तानी पायलट घाबरले.

या संपूर्ण ऑपरेशनमध्ये स्क्वाड्रन लीडर यांचीदेखील एक महत्त्वाची भूमिका होती. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानने एफ -16 हल्ला केला आहे. ज्यामध्ये मध्यम श्रेणीतील एआयएम-120 सी प्रगत मिसाइल वापरण्यात आलं आहे.

SPECIAL REPORT : हेच 'ते' महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे बेताल नेते!

First published: April 4, 2019, 10:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading